Satara Accident: साताऱ्यात भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर खोल दरीत कोसळला

Tourist Vehicle Falls into Deep Valley in Satara: सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध वजराई धबधब्याजवळ आज भीषण अपघाताची घटना घडली आहे. पर्यटकांनी भरलेली एक टेम्पो ट्रॅव्हलर खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
satara news
satara newssaam tv
Published On

सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध वजराई धबधब्याजवळ आज भीषण अपघाताची घटना घडली आहे. पर्यटकांनी भरलेली एक टेम्पो ट्रॅव्हलर खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या अपघातात चार ते पाच जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

जखमींना तात्काळ सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही टेम्पो ट्रॅव्हलर कोल्हापूर वरून वजराई धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची असल्याची माहिती मिळते. वाहनात १४ ते १५ जण प्रवास करत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

satara news
Maharashtra Government Decision: राज्य सरकारचा निर्णय; विधि आणि न्याय विभागात नोकरीची संधी, Typistच्या नवीन ५ हजार पदांची निर्मिती

सध्या राज्यात तूफान पाऊस चालू असून यामुळे डोंगराळ भागात हिरवाई आली आहे. तसेच प्रत्येक शहराच्या आजूबाजूला धबधबे हे ओसंडून वाहत आहे. याच धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी लोक जात असतात. याच हाच आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरचे काही पर्यटक हे सातारा येथील वजराई धबधब्याला गेले असता तेथून परत असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे.

satara news
Beed Police : बीड पोलीस दलात मोठी उलथापालथ; पोलीस अधीक्षकांचा एक आदेश अन् पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील 14 ते 15 जण पावसाचा आनंद लुटण्यासाठी गेले असता परत येताना कास बामनोली परिसरात घनदाट धुके असल्यामुळे ड्रायव्हरला वळणाचा अंदाज न आल्याने वाहन दरीत कोसळला. यामध्ये 14 ते 15 जण हे जखमी झाले असून या सर्व पर्यटकांना सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

satara news
Nashik Jindal Company Fire: जिंदाल कंपनीतील तब्बल ५ हजार कामगारांवर उपासमारीची वेळ, काय आहे कारण?

स्थानिक प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, बचाव कार्य सुरु आहे. याबाबतची अधिक माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com