Accident: नाशिकमध्ये अपघाताचा थरार! भरधाव दुचाकीची एसटी बसला धडक, ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Nashik ST Bus And Bike Accident: नाशिकमध्ये भयंकर अपघाताची घटना घडली. भरधाव दुचाकीने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.
Accident: नाशिकमध्ये अपघाताचा थरार! भरधाव दुचाकीची एसटी बसला जोरदार धडक, ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू
Nashik Accident Saam Tv
Published On

Summary -

  • भरधाव दुचाकीने एसटी बसला धडक दिली.

  • नाशिकच्या साक्री – शिर्डी महामार्गावर वनोलीजवळ अपघात.

  • या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

  • चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला.

अजय सोनावणे, नाशिक

नाशिकमध्ये भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीने एसटी बसला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तिघेही मित्र होते. ही अपघाताची घटना साक्री - शिर्डी महामार्गावर घडली. या अपघातानंतर घटनास्थळी तणावाचे वातावरण होते. नाशिक पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या साक्री - शिर्डी महामार्गवरील वनोली गावाजवळ ही घटना घडली. एसटी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. नंदुरबार-वसई एसटी बस ताहाराबादकडून येत होती. हॉटेल अधिराजवळील वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीने एसटी बसला धडक दिली.

Accident: नाशिकमध्ये अपघाताचा थरार! भरधाव दुचाकीची एसटी बसला जोरदार धडक, ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू
Accident News : गावी परतताना काळाचा घाला; बसची मोटारसायकलला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते तिघेही बसच्या पुढच्या चाकाखाली आले. या अपघतामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. अधिक रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की अर्धी दुचाकी एसटी बसच्या मशीनमध्ये अडकली होती. या घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी काही वेळातच वाहतूक सुरळीत केली.

Accident: नाशिकमध्ये अपघाताचा थरार! भरधाव दुचाकीची एसटी बसला जोरदार धडक, ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू
Jamner Accident : भरधाव डंपरने तरुणाला चिरडले; संतप्त ग्रामस्थांचा मृतदेहासह रास्ता रोको

दरम्यान, बदलापूरच्या कात्रप रिंग रूटवर एका दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक महिला आणि दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झालेा. पहाटे पावणेचारच्या सुमारास हा अपघात झाला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. निर्मला गायकवाड पहाटे पावणे चारच्या सुमारास दुचाकीवरून मेडीकल स्टोअरमध्ये जात असताना कात्रप तलाव रिंग रूटवरील कल्पसिटीजवळ एका वाहनाने त्यांना मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Accident: नाशिकमध्ये अपघाताचा थरार! भरधाव दुचाकीची एसटी बसला जोरदार धडक, ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू
Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com