Shirdi News: शिर्डी ट्रस्टचे कोट्यवधी उत्पन्न, तरीही लाडू प्रसाद महाग, साईभक्तांचा संताप|VIDEO

Shirdi Sai Baba Laddu Price Hike 2025: शिर्डी साईबाबांच्या लाडू प्रसादाच्या दरात 50 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. 20 रुपयांचा दोन लाडूंचा पॅक आता 30 रुपयांना मिळणार असून, या निर्णयावर भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
Summary

साईबाबांच्या लाडू प्रसादाच्या दरात 50% वाढ

20 रुपयांचा दोन लाडूंचा पॅक आता 30 रुपयांना मिळणार

स्वस्त व मध्यमवर्गीय पॅक बंद करून प्रीमियम पर्याय ठेवला

भाविकांमध्ये नाराजी, संस्थेवर व्यावसायिक दृष्टिकोनाचा आरोप

शिर्डी: साई भक्तांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. साईबाबांच्या बुंदी लाडू प्रसादाचा भाव 50 टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. पूर्वी 20 रुपयांना मिळणारे दोन लाडूचे पाकिट आता 30 रुपयांना मिळणार आहेत. या दरवाढीमुळे साईभक्तांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे..

साई दर्शनानंतर भाविकांना मोफत वाटल्या जाणाऱ्या बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्याच्या हेतूने साई संस्थानने ही दरवाढ केल्याच बोललं जातंय. मात्र भाविकांच्या देणग्यांवर चालणाऱ्या विश्वस्त संस्थेने असा 'व्यावसायिक' दृष्टिकोन ठेवून असा तोटा भरून काढावा का? प्रश्न भाविक करत आहेत. विशेष म्हणजे गोरगरिबांना परवडणारे 10 रुपयांचे एक लाडूचे पाकीट आणि मध्यमवर्गीयांना सोयीचे 25 रुपयांचे तीन लाडूचे पाकीट बंद करून संस्थानने केवळ एकच 'प्रीमियम' पर्याय ठेवला आहे. एकीकडे मोफत भोजनाचा आणि माफक दरातील चहा, कॉफी, दूध, नाश्त्याचा कौतुकास्पद उपक्रम, तर दुसरीकडे प्रसादातून हिशोब जुळविण्याची कसरत, हे गणित काही भाविकांना कळेनासे झाले आहे. खरंतर साई समाधीच्या दर्शनानंतर भाविक मोठ्या श्रद्धेने हा लाडू प्रसाद घरी घेऊन जातात.. बाबांच्या दर्शनानंतर प्रसादाची गोडी आता भाविकांच्या खिशाला परवडणार का? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com