Boisar News: बोईसरमध्ये खड्ड्यातील पाण्यात बुडून 3 मुलांचा मृत्यू; एकाला वाचवण्यात यश

Boisar drowning incident: गणेश नगर परिसरातील झोपडपट्टीत राहणारी चार शाळकरी मुले दुपारच्या सुमारास घराजवळील भिंत ओलांडून घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेतील खड्ड्यात पोहण्यासाठी गेले होते.
Boisar drowning incident
Three schoolchildren drown in Boisar while swimming in a waterlogged pit saam tv
Published On

रुपेश पाटील, साम प्रतिनिधी

बोईसरमध्ये खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चारपैकी तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यातील एका मुलाला वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बोईसरमधील गणेशनगर परिसरात असलेल्या खासगी जागेतील खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन अल्पवयीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गणेश नगर परिसरातील झोपडपट्टीत राहणारी चार शाळकरी मुले दुपारच्या सुमारास भिंत ओलांडून घराच्या पाठीमागील असलेल्या मोकळ्या जागेतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेले होते.

Boisar drowning incident
Nanded Heavy Rain : नांदेड जिल्ह्यातील ३९ महसूल मंडळात अतिवृष्टी; माहूर मंडळात सर्वाधिक पाऊस

मात्र पोहताना यापैकी तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला असून एका मुलाला पाण्याबाहेर निघण्यास यश मिळाले. या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस आणि तारापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून खड्ड्याने भरलेल्या पाण्यातून तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी बोईसर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा समावेश असून दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

डबक्याच्या पाण्यात बुडून सख्ख्या चिमुकल्या भाऊ बहिणीचा मृत्यू

बोईसरप्रमाणेच छत्रपती संभाजीनगरमध्येही अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. साचलेल्या पाण्यात बुडून दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील मोढा बुद्रूक शिवारात ही घटना घडली आहे. साचलेल्या पाण्यात बुडून सख्या बहीण आणि भावाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मोढा बुद्रूक शिवारात घडली.

मुसळधार पावसामुळे शेतशिवारात पाणी साचलेलं आहे. दुपारी गणेश कांबळे यांची मुलगी हर्षदा गणेश कांबळे (वय ६ वर्ष) आणि मुलगा रुद्र गणेश कांबळे (वय अडीच वर्ष) दोघे घराजवळील साचलेल्या डबक्याच्या पाण्याजवळ गेले. दोघे डबक्या जवळ खेळत होते. डबक्याच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com