Nanded Heavy Rain : नांदेड जिल्ह्यातील ३९ महसूल मंडळात अतिवृष्टी; माहूर मंडळात सर्वाधिक पाऊस

Nanded News : नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवस झाले जोरदार पाऊस होत आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील ३९ मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे
Nanded Heavy Rain
Nanded Heavy RainSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील 24 तासात जिल्ह्यातील ९५ पैकी तब्बल ३९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. दमदार पडलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के पेरण्या झाल्या असून उर्वरित ४० टक्के पेरण्यांना आता वेग येणार आहे.

नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवस झाले जोरदार पाऊस होत आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील ३९ मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. यात माहूर मंडळात १५६ एवढ्या विक्रमी मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा मे महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. या अवकाळी पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी ५० टक्के पेरण्या केल्या होत्या. दरम्यान पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे पेरण्या रखडल्या होत्या.

Nanded Heavy Rain
Sambhajinagar ZP : संभाजीनगर जिल्हा परिषदेत मोठा घोटाळा; काम न करता अधिकाऱ्यांनी काढली ४ कोटींची बिले

दुबार पेरणीचे संकट टळले 

पावसाने दडी मारल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केल्या त्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मागील २४ तासात नांदेड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट सध्यातरी टळल आहे.

Nanded Heavy Rain
Pandharpur Wari : महिला आयोगाचे भाविकांसाठी मोबाईल ॲप; महिला भाविकांना ॲपद्वारे माहिती घेणे सहज शक्य

विदर्भातील पावसाचा फटका हिंगोली जिल्ह्याला
विदर्भात गेल्या काही दिवसापासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्या व नाल्यांना पूर आला आहे. याच पुराचा फटका मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याला बसला आहे. विदर्भातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव परिसरातील शेकडो एकर शेतीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या पाण्यामुळे सोयाबीन, हळद, कापूस, तूर, उडीद, मूग या पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com