विश्वभूषण लिमये
वाहन चालवताना मोबाइल वापरण्यावर बंदी आहे. तरीही वाहनचालकांकडून त्याकडे सर्रासपणे कानाडोळा केला जात आहे. यातूनच अपघाताचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता सोलापूर वाहतूक शाखा अॅक्टिव्ह मोडमध्ये आली (Traffic Rules Violation) आहे. त्यांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. (latest marathi news)
सोलापूर शहरात मोबाइलवर बोलत ड्रायव्हिंग अन् ट्रिपल सीटचे प्रमाण मोठ्या खूप वाढलं आहे. असे द्श्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याप्रकरणी आता सोलापूर गुन्हे शाखा कारवाई करत (E Challan Cases Solapur) आहे. आतापर्यंत १०८८ कारवाया करण्यात आल्या आहेत. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तींकडून सव्वा लाखाचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी धडक मोहीम
सोलापूर वाहतूक शाखेच्या वतीनं वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. मोबाइलवर बोलत गाडी चालवणे आणि ट्रिपल सीट आढळल्यास कारवाई केली (Triple Seat Cases) जात आहे. सीसीटीव्ही कॅमेरा आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या मदतीने दुचाकी सुरू ठेवून मोबाइलवर बोलणारे ५८ जण आणि ट्रिपल सीट २७ जण अशा एकूण ८५ जणांवर ई-चालानचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
वाहतूक शाखेच्या उत्तर - दक्षिण विभागाच्या वतीने शहरातील विविध भागांत वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला (Talking On Mobile While Driving) आहे. ही कारवाई कायमस्वरूपी चालणार आहे. त्यामुळे आतापर्यंत १ हजार ८८ कारवाया देखील करण्यात आल्या आहेत.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्णय
पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या कारवाई दरम्यान जवळपास सव्वा लाखांचा दंड आकारण्यात आला (Solapur News) आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल उचलत आहे.
सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार मोबाइलवर बोलत दुचाकी चालविल्यास एक हजार रुपये, चारचाकी वाहन चालकाला दोन हजार रुपये, तर अन्य वाहनचालकाला चार हजार रुपये दंड आकारण्याचा (E Challan) नियम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.