Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार, छुप्या प्रचाराला येणार वेग

सायंकाळपासून निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावणार असल्याने गावांत छुपा प्रचाराला वेग येणार आहे.
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionSaam TV

जयेश गावंडे

Gram Panchayat Election : अकोला (Akola) जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये थेट सरपंचपदांसह सदस्यपदांसाठी उमेदवारांच्या लढतींचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता निवडणूक प्रचाराचा धुरळा सुरू आहे. १८ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रचाराला आजचा दिवस उरला असून, आज सायंकाळपासून निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावणार आहेत. दरम्यान त्यानंतर गावागावांत छुपा प्रचाराला वेग येणार आहे.

या निवडणुकीत (Election) पक्ष म्हणून रिंगणात उतरण्यापेक्षा पॅनल करून कार्यकर्ते उभे आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षात काम करताना निर्माण झालेले मतभेद हेवेदावे विसरून पदाधिकाऱ्यांनी पॅनलच्या माध्यमातून सध्या ताकद दाखविणे सुरू केले आहे. जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, मूर्तिजापूर व पातूर या सातही तालुक्यांतील २६६ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांसह सदस्यपदांसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत आहेत. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा प्रचाराचा वेग वाढत असल्यामुळे गावागावांतील प्रचार शिगेला पोहोचला आहे. यामुळे गावांतील वातावरण ढवळून निघाले आहे.

Gram Panchayat Election
Bazar Samiti Election : अखेर बाजार समित्यांच्या निवडणुका ढकलल्या पुढं; जाणून घ्या कारण

रिंगणातील तालुका सरपंचपद सदस्य संख्या

मूर्तिजापूर १९२ ६८०

अकोट १०९ ५८०

तेल्हारा ७१ ३६५

बाळापूर १०६ ३६१

अकोला १९२ ८०६

बार्शीटाकळी १६८ ६८७

पातूर १०२ ४३८

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : पत्नीचा निवडणूक प्रचार करताना पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू; मन हेलावून टाकणारी घटना

एकूण ९४० ३९१७ जागांपैकी प्रत्येक तालुक्यामध्ये किती जागा आहेत?

मूर्तिजापूर ५१ ३९१

अकोट ३७ ३०५

तेल्हारा २३ १९१

बाळापूर २६ १९८

अकोला ५४ ४०४

बार्शीटाकळी ४७ ३५९

पातूर २८ २२६

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com