अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर १० राऊंड फायरिंग; 2 जण गंभीर जखमी, सिनेसृष्टीत खळबळ

Tiger Shroff Firing Incident During Football Match: मुंबईतील जुहू-विलेपार्ले पश्चिम परिसरात टायगर श्रॉफ फुटबॉल सामन्यावरून जात असताना गोळीबाराची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी दहा राऊंड फायर केल्याची माहिती आहे.
Tiger Shroff firing incident during football match in Mumbai
Tiger Shroff firing incident during football match in Mumbaisaam tv
Published On: 

संजय गडदे/साक्षी यादव, साम टीव्ही

सिनेसृष्टीला हादरवून टाकणारी गोळीबाराची घटना मुंबईतील जुहू परिसरात घडली आहे. अभिनेता टायगर श्रॉफ फुटबॉल खेळून घरी जात असताना गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दुचाकीवरून आलेल्या तीन जणांकडून हा गोळीबार करण्यात आला तब्बल 10 राऊंड या ठिकाणी फायर करण्यात आले सुदैवाने यातील कोणतीही गोळी टायगर श्रॉफ ला जरी लागली नसली तरी मात्र त्यासोबत असणाऱ्या चालक आणि एक रिक्षावाला गोळीबारात जखमी झाला.

सामन्याचे कव्हरेज करणाऱ्या व्यक्तीला लागली गोळी

विलेपार्ले पश्चिम परिसरात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली असून, घटनास्थळी तब्बल दहा राऊंड फायर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारात फुटबॉल सामन्याचे कव्हरेज करणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला गोळी लागली. जखमी व्यक्तीला सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डाव्या स्तनाग्राच्या सुमारे दोन सेंटीमीटर खाली गोळी लागल्याची जखम झाली आहे. BMC ने दिलेल्या माहितीनुसार, जखमी व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेनंतर घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून, गोळ्यांच्या पुंगळ्या जमा करण्यात आल्या आहेत. गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, तसेच या घटनेमागे कोणाचा हात आहे, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

टायगर श्रॉफ उपस्थित असलेल्या फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस तपासातून या घटनेबाबत आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com