शाळेच्या मैदानात वाघाचे ठसे; नागरिकांमध्ये घबराट
शाळेच्या मैदानात वाघाचे ठसे; नागरिकांमध्ये घबराटसंजय राठोड

शाळेच्या मैदानात वाघाचे ठसे; नागरिकांमध्ये घबराट

वणी तालुक्यातील साखरा-दरा येथील आदर्श शाळेच्या मैदानात वाघाच्या पायाचे ठसे आढळल्याची धक्कादायक घटना घडला आहे.
Published on

वणी तालुक्यातील साखरा-दरा येथील आदर्श शाळेच्या प्रांगणात वाघाच्या पायाचे ठसे आढळल्याची धक्कादायक घटना घडला आहे. ही भयभीत करणारी घटना दुपारच्या वेळेस घटली जेंव्हा हे ठसे शिक्षकांना दिसले त्यावेळी त्यांनी तेथील काही ग्रामस्थांना सांगितली जशी ही गोष्ट संपुर्ण परिसरात पसरली तशी एकच चर्चा ती म्हणजे वाघाच्या पाऊलांच्या ठशांची खूप रंगली.Tiger footprints were found on the school grounds

मात्र परिसरात वाघांच्याTiger या मुक्तसंचारामुळे विद्यार्थ्यांचाStudents जीव टांगणीला तर लागलाच आहे तसेच आसपासच्या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. कारण याआधी वाघांच्या हल्ल्यात झरीजामनी तालुक्यातील एका युवकाचा मृत्यू झाला होता.Death of a youth

साखरा-दरा येथील आदर्श शाळेच्या प्रांगणात दुपारी वाघाच्या पायाचे ठसे आढळताच शिक्षकांनी याबाबत ग्रामस्थांना सूचित केले. त्याप्रमाणेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या गंभीर बाबीची कल्पना देण्यात आली आहे.

दरम्यान उशिरा पर्यंत वनविभागाच्याForest Department कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देण्याचे सौजन्य दाखवले नाही. वणी उपविभागात सातत्याने वाघांचा मुक्तसंचार सुरू असतो. झरीजामनी तालुक्यातील पिवरडोल या गावातील अविनाश पवन लेनगुरे या 17 वर्षीय तरुणाला लक्ष केले होते.

शाळेच्या मैदानात वाघाचे ठसे; नागरिकांमध्ये घबराट
विदर्भातील वाघांची सह्याद्रित डरकाळी !

अशा घटना या परिसरात नेहमीच घडताना दिसत आहे. अनेक व्यक्तींना जायबंदी तर जनावरांचा फडशा वाघाने पाडला आहे. साखरा-दरा या गावात चक्क.. शाळेच्या प्रांगणात वाघाच्या पायाचे ठसे आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने मुक्तसंचार करणाऱ्या त्या वाघाचा बंदोबस्त करा अशी मागणी होत आहे.

Edited By- Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com