संजय डाफ
नागपूर : विदर्भात हा टायगर कॅपिटल म्हणून ओळखला जातो. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढते आहे. विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यात वांघांची संख्या वाढली असून त्यामुळं मानव-वन्यजीव संघर्ष बघायला मिळत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी चंद्रपुरातील Chandrapur वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात केलं जाणार आहे. त्यामुळं लवकरच विदर्भातील Vidarbha वाघ सह्याद्रीत डरकाळी फोडताना दिसतील.
हे देखील पहा-
राज्यातील एकूण वाघांची संख्या 312 एवढी आहे. त्यातील 300 वाघ विदर्भात आहेत. या तीनशे वाघांपैकी 180 ते 185 वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. वाघांची संख्या वाढत असतानाच मानव-वन्यजीव संघर्षही वाढत चालला आहे. त्यामुळं हा संघर्ष टाळण्यासाठी चंद्रपूर व्याघ्र प्रकल्पातील वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरीत केले जाणार आहेत. सुरुवातीला चांदोली वन परिक्षेत्रात सांबर तर कोयना वन परिक्षेत्रात चितळ सोडले जाणार आहेत. तृण भक्षक प्राण्यांची संख्या वाढल्या नंतर वाघांचं स्थानांतरण Migration केलं जाईल.
तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढल्यावर वाघांच्या स्थानांतरण केलं जाणार आहे. यासाठी राज्य सरकारनं वन्यजीव व्यवस्थापनासाठी राज्यस्तर कृती आराखडा तयार केलाय. मानव आणि वन्यजीव सहजीवन सुकर व्हावं, यासाठी वाघांचं स्थानांतरण केलं जाणार आहे.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.