दगडाने ठेचून युवकाचा खून; नागपूर तुळजापूर महामार्गावरील घटना
दगडाने ठेचून युवकाचा खून; नागपूर तुळजापूर महामार्गावरील घटनाSaam Tv

दगडाने ठेचून युवकाचा खून; नागपूर तुळजापूर महामार्गावरील घटना

उमरखेड, शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील नागपूर तुळजापूर महामार्गावर पैनगंगा नदीच्या पुलाजवळ वीस वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला आहे.
Published on

संजय राठोड

यवतमाळ: उमरखेड, शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील नागपूर तुळजापूर महामार्गावर Nagpur- Tuljapur Highway पैनगंगा नदीच्या पुलाजवळ वीस वर्षीय युवकाचा मृतदेह Dead Body आढळून आला आहे. त्याच्या डोक्यावर दगडाने ठेचल्याचे जखमा असल्यामुळे त्याचा खून झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हे देखील पहा-

या घटनेने पोलिस Police वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अक्षय वसंतराव करे वय 20 वर्ष असे मृतक युवकाचे नाव आहे. दुपारी शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर नागपूर तुळजापूर महामार्गावरील पैनगंगा नदीच्या पुलाच्या अलीकडे कार्तिक ट्रेडिंग कंपनीच्या शेड समोर त्याचा मृतदेह बाजूच्या शेतातील शेतकऱ्यांनी पाहिला. याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन ठाणेदार आनंद वागतकर हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले.

दगडाने ठेचून युवकाचा खून; नागपूर तुळजापूर महामार्गावरील घटना
लातुरात एका तरुणाचा चाकूने भोसकून खून

प्रथम दर्शनी सदर युवकाच्या डोक्याला मार लागलेला व गंभीर अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. सदर युवकाचा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनु राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आनंद वागतकर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गाडे करीत आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com