Sangli News
Sangli Newsविजय पाटील

सांगली महापालिकेच्या घंटा गाडीला लटकून आजीच्या लिफ्टचा थरारक प्रवास...

मिरज शहरातील एका आजी बाईचा लिफ्टचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कारण या आजीचा लिफ्टचा प्रकार हा गाडीत बसून नव्हता तर गाडीला लटकून होता.
Published on

सांगली - एका आजीच्या लिफ्टचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. सांगली महापालिकेच्या घंटा गाडीला लटकून आजीने प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.मिरज मध्ये हा धोकादायक प्रवासाचा प्रकार घडला आहे. त्यामुळे नागरिकांमधून सदरच्या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. मिरज शहरातील एका आजी बाईचा लिफ्टचा थरारक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. कारण या आजीचा लिफ्टचा प्रकार हा गाडीत बसून नव्हता तर गाडीला लटकून होता. (thrilling journey of old women by hanging Sangli Municipal Corporation garbage truck)

हे देखील पहा -

मिरज (Miraj) शहरातल्या स्टेशन चौक येथून विजय नगर पर्यंत गाडीला लटकून आजीबाईचा हा थरारक लिफ्टचा प्रवास मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या घंटागाडीला लटकून या आजीबाईचा हा थरारक प्रवास झाला आहे. स्टेशन चौक येथून आजीबाईने घंटागाडीला लिफ्ट मागितली आणि त्यानंतर घंटागाडी चालकाने आजीला मागे बसवण्यास सांगितले आणि आजीने गाडीच्या साईडला एका बाजूला उभा राहात तीन ते चार किलोमीटरचा प्रवास केला.

Sangli News
पैशावरून आईबद्दल वापरलेले अपशब्द जिव्हारी; अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

या दरम्यान काही नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये सदरचा प्रकार चित्रित केला आणि पुढे जाऊन ही गाडी थांबवून घंटागाडी चालकाची चांगलीच कान उघाडणी केली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com