हृदयद्रावक! मामाच्या गावी आलेल्या ३ शाळकरी मुलींचा धरणात बुडून मृत्यू; गावावर दुःखाचा डोंगर

Three schoolgirls drown in karul dam : सिंधुदुर्गातील करूळमध्ये हृदयद्रावक घटना घडली. मित्र-मैत्रिणींसोबत धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू झाला.
करूळ येथील धरणात बुडून तीन शाळकरी मुलींचा मृत्यू
three schoolgirls drown in karul jamdarwadi dam during summer outingsaam tv
Published On
Summary
  • सिंधुदुर्गात हृदयद्रावक घटना

  • ३ शाळकरी मुलींचा धरणात बुडून मृत्यू

  • करूळ जामदारवाडी धरण परिसरात दुर्घटना

  • अख्ख्या गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग | साम टीव्ही

उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मामाच्या गावी आलेल्या तीन शाळकरी मुलींचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज, बुधवारी घडली. या तिघीही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पोहण्यासाठी धरणाकडे गेल्या होत्या. करूळ जामदारवाडी धरणाच्या परिसरात ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तन्वी अनंत माळकर (१६ वर्ष), स्वरा संदीप सुर्वे (११ वर्ष) आणि ऋतिका संतोष पाटील (१४ वर्ष) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. यापैकी दोघी मुली करूळ भोयडेवाडी येथील होत्या, तर एक मुलगी कुसूर येथील होती. त्या आपल्या मामाच्या गावी आल्या असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.

बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास एकूण ६ जण (४ तरुणी आणि २ तरुण) जामदारवाडी धरणावर अंघोळीसाठी गेले होते. पोहण्याचा मोह आवरता न आल्याने त्या पाण्यात उतरल्या, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघी खोल पाण्यात बुडू लागल्या. सोबत असलेल्या इतर तिघांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन त्यांना बाहेर काढले, मात्र दुर्दैवाने त्यांचा जीव वाचू शकला नाही.

करूळ येथील धरणात बुडून तीन शाळकरी मुलींचा मृत्यू
Crime News: सून तोकडे कपडे घालून रिल्स बनवायची; वैतागलेल्या सासू-सासऱ्याची आत्महत्या

या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तीन मुलींचा असा मृत्यू झाल्याने करूळ गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

करूळ येथील धरणात बुडून तीन शाळकरी मुलींचा मृत्यू
Sangli Tragedy : वडिलांना बुडताना बघितलं, थेट नदीत उडी घेतली; २० वर्षांच्या मुलीचा बुडून मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com