Akola News: अकोल्यात एकाच दिवसात 3 मोठे अपघात, 5 जणांचा मृत्यू

Akola Accident News: अकोला जिल्ह्यात एकाच दिवशी तीन मोठे अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत पाच लोक मरण पावले आहेत.
अकोल्यात एकाच दिवसात 3 मोठे अपघात, 5 जणांचा मृत्यू
Akola Accident NewsSaam Digital

Akola Accident News:

>> अक्षय गवळी, साम टीव्ही, अकोला प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यात एकाच दिवशी तीन मोठे अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत पाच लोक मरण पावले आहेत. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा-बेलखेड मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली आहे. दोन्ही दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांमध्ये एका लहान मुलीचा आणि एका मुलाचा तसेच एका पुरुषाचा देखील समावेश आहे. जखमींना अकोला येथील रुग्णालयात केले दाखल आहे.

मरण पावलेले एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. वडिलांचं मुलगा आणि मुलगी मरण पावले आहे. तर आई गंभीर स्वरुपात जखमी झाली आहे. आशिक खानं कुदरत खान, असं वडीलाच नाव आहे. तर बुशरा खानं (वय 6), आणि हराण हासिफ खान अस मरण पावलेल्या मुला मुलीचं नाव आहे. सुदैवांन या अपघातामध्ये चार महिन्याची मुलगी बजावली आहे, तर आई गंभीर असून तिच्यावर अकोल्यात उपचार सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही मोटरसायकलचा अक्षरशः चुराळा झालाय. दुर्दैवाने अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले आहेत.

अकोल्यात एकाच दिवसात 3 मोठे अपघात, 5 जणांचा मृत्यू
Pune hit And Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरण; 'त्या' अल्पवयीन मुलाला काय झाली शिक्षा? जाणून घ्या

पातुरच्या अपघातात सैनिकाचा मृत्यू

अकोला जिल्ह्यातील पातूर-अकोला रस्त्यावरील चिखलगाव गावाजवळ आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. जनावरांचं कुटार वाहून नेणारा ट्रक विरूद्ध दिशेने आल्याने ट्रक आणि कारचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अपघातानंतर ट्रक रस्त्यावर पलटी झाला असून कारचा अक्षरशः चुराळा झालाय. या घटनेची माहिती मिळताच पातुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अपघाती वाहनांना बाजूला करून वाहतुकीचा मार्ग सुरळीत केला.

या अपघातात एका सैनिकाचा मृत्यू झाला आहे. विशाल गुलाब तायडे, असं या सैनिक जवानाचं नाव आहे. अपघातात गंभीर स्वरुपात जखमी झाले होते. उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशाल तायडे हे सुट्टीवर आले होते. आते भाऊ आणि मावस भावाबरोबर कारने जात असतानाच वाटतेच त्यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला.

अकोल्यात एकाच दिवसात 3 मोठे अपघात, 5 जणांचा मृत्यू
INDIA आघाडी 300 जागा जिंकलीय, पाचव्या टप्प्याच्या मतदानाआधीच तेजस्वी यादव यांचा मोठा दावा

दरम्यान, अपघाताच्या तिसऱ्या घटनेत जेसीबी खाली आल्याने एकाचा जागीच मृत्यू झालाय. तेलारा शहरात रस्त्याचं बांधकाम सुरू होतं. या जेसीबी काम करत असतानाच अचानकपणे एका व्यक्तीचा तोल गेल्याने तो जेसीबी खाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com