Pandharpur Sugar Factory: यंदा साखरेच्या उत्पादनात घट होणार; पंढरपूर विठ्ठल साखर कारखान्याच्या अध्यक्षांचा अंदाज

दिवाळीत ग्राहकांना 50 रुपये किलो दराने साखर खरेदी करावी लागेल?
Pandharpur Sugar Factory
Pandharpur Sugar FactorySaam Tv
Published On

Pandharpur News Today: यंदा राज्यात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नसल्याने ऊस आणि साखरेचे उत्पादन घटणार आहे. परिणामी ऑक्टोंबर मध्ये साखर कारखाने सुरू झाले नाही तर ऐन दिवाळीत ग्राहकांना 50 रुपये किलो दराने साखर खरेदी करावी लागेल अशी माहिती पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली. (Latest Marathi News)

Pandharpur Sugar Factory
Shahaji Patil News : भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांची महत्त्वकांक्षा, मात्र शिंदेंचे नेतृत्व भक्कम; शहाजी बापूंचा अजित दादांना अप्रत्यक्ष टोला

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आयोजित शेतकरी (Farmer) मेळाव्यात ते बोलत होते. जूनमध्ये पाऊस पडला नसल्याने ऊस उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन देखील 15 ते 20% ने घटणार आहे. ऐन सणासुदीच्या काळात साखरेचा तूटवडा भासणार आहे. यामुळेच दिवाळीमध्ये साखर पन्नाशी गाठेल. (Pandharpur News)

Pandharpur Sugar Factory
Andhra Pradesh Government Hospital: हृदयद्रावक! सरकारी रुग्णालयात ८ रुग्णांचा गुदमरुन मृत्यू; धक्कादायक कारण आलं समोर

तर दुसरीकडे परदेशामध्ये साखर 80 रुपये किलोने विकली जात आहे. मात्र भारतामध्ये साखरेच्या निर्यातीवर बंदी असल्याने परदेशात साखरेची स्मगलिंग केली जात असल्याचा आरोप देखील अभिजीत पाटील यांनी केलाय. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याचे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com