Manoj Jarange Patil: हे सरकार मला कधीही मारू शकतं, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: फडणवीस आणि त्यांच्या आमदारांचा मला बदनाम करण्याचा डाव, माझ्या विरोधात ट्रॅप रचलाय, षडयंत्र रचले, मात्र गरीब मराठा माझ्यासोबत. मी मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील
हे सरकार मला कधीही मारू शकतं, मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य
Manoj Jarange PatilSaam Tv
Published On

हे सरकार मला कधीही मारू शकतं, असा गंभीर आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे मराठा समाजाच्या घोंगडी बैठकीत केला आहे. जरंगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. भाजप आमदारांच्या आरोपावर आणि टीकेवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या आमदारांनी मला बदनाम करण्याचे अभियान सुरू केले आहे. माझ्या विरोधात ट्रॅप रचलाय. मी मागे हटत नाही, त्यामुळे बदनाम करण्याचा डाव आहे.

जरांगे पाटील म्हणाले, की त्यांनी मला बदनाम करायचं अभियान राबवायचं सुरू केल आहे. फडणवीस यांनी ट्रॅप सुरू केलाय, त्यांना द्वेष आहे माझ्याविषयी, त्यांना गरीब मराठे मोठे होऊन द्यायचे नाहीत. काहीही षडयंत्र ते रचत आहे माझ्यावर...मला बदनाम करण्याचा डाव आहे. खूप दिवसाचा खेळ सुरू आहे. त्यांना निवडून येण्यासाठी मला काहीही करून त्यांना बाजूला करायचं आहे.

हे सरकार मला कधीही मारू शकतं, मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य
Dhanjay Munde: जरांगे-मुंडेंमध्ये मध्यरात्री गुफ्तगू; पंकजा मुंडेंचा पराभव, धनजंय मुंडेंची खबरदारी

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ''मला वाटतं आरक्षण जर गेलं तर आमचा मराठा समाज संपेल. ते सर्व पैशाचा, सगळ्या शक्तीचा वापर करत आहेत. मी आणि माझा गरीब मराठा समाज ताकतीने एकजूट होत आहोत. त्यांच्याकडे मला बदनाम केल्याशिवाय पर्याय नाही. मला उघड पाडल्याशिवाय पर्याय नाही. मला कितीही बदनाम केलं तरी माझा मराठा समाज मला सोडून जाऊ शकत नाही.''

'सर्वच आमदार पाडावे लागणार'

ते म्हणाले, ''शरीर मला राहिलं नाही. जीवन म्हणून सुद्धा मला वैयक्तिक जीवन राहिलं नाही, ना मला कसली हाऊस मौस आहे, ना कसला मोह आहे. मी फक्त आणि फक्त समाजाचे सुख बघतो. त्यामुळे यांनी कसलेही हत्यार माझ्या विरोधात उपसले, बदनामीच उचलू द्या, आरोप करायचा उचलू द्या, ते यशस्वी होणार नाहीत, उलट माझा मराठा ताकतीने उभा राहणार, कारण मी समाजाशिवाय काहीच करत नाही. कारण आमच्या विरोधात आमचेच आमदार घालत आहेत, त्यामुळे आम्हाला राज्यातले सर्वच आमदार पाडावे लागणार आहेत, असं म्हणत मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हे सरकार मला कधीही मारू शकतं, मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य
Dhanjay Munde: जरांगे-मुंडेंमध्ये मध्यरात्री गुफ्तगू; पंकजा मुंडेंचा पराभव, धनजंय मुंडेंची खबरदारी

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून परळी व केज येथील घोंगडी बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही बाब सांगितली. मला अचानकपणे त्रास होऊ लागला असून मी आता अंतरवाली येथे जाऊन उपचार घेणार असल्याचे मनोज जारंगे पाटील यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com