लातुरमध्ये कोरोना निर्बंधांत शिथिलता नाही

कोरोना निर्बंधांमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता जिल्हा प्राधिकरणाने दिलेली नाही, अशी माहिती लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी दिली आहे.
लातुरमध्ये कोरोना निर्बंधांत शिथिलता नाही
लातुरमध्ये कोरोना निर्बंधांत शिथिलता नाही SaamTv
Published On

लातूर : लातूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता जिल्हा प्राधिकरणाने दिलेली नाही, अशी माहिती लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने लातूर जिल्हा प्राधिकरणाच्या वतीने लेव्हल- ३ चे निर्बंध लातूरमध्ये लावण्यात आलेले आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत आदेशानुसार आस्थापना व बाजारपेठा सुरू राहणार आहेत. या नियमावलीत कोणत्याही प्रकारची शिथिलता प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली नाही. निर्बंधातील शिथिलतेसंदर्भात जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी अगोदर दिलेले आदेशच कायम राहणार आहेत, असेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले आहे.

लातुरमध्ये कोरोना निर्बंधांत शिथिलता नाही
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस-भाजपमध्ये राडा !

लातूर शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाणार आहे तसेच बाजारपेठ व आस्थापनांच्या वेळेत देखील वाढ केली जाणार आहे, अश्या प्रकारच्या चर्चांना उधाण आलेले आहे. परंतु, आता जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी निर्बंधात शिथिलता देण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केल्यामुळे आता पूर्वीप्रमाणेच बाजारपेठ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरु राहणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com