Malegon News
Malegon NewsSaam TV

Malegaon News: मालेगावात चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच रात्री 3 घरफोड्या करत लाखोंचा ऐवज लंपास

एकाच रात्री लखाणे गावात तीन घरफोड्या झाल्या आहेत.
Published on

Malegaon News: मालेगावात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. एकाच रात्री लखाणे गावात तीन घरफोड्या झाल्या आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून त्यांचे पुढील तपास सुरू आहेत. (Latest Marathi News)

काल मध्यरात्री सर्वांत आधी डॉ. कैलास त्र्यंबक इंगळे यांच्या घरी चोरटे शिरले. रात्री अडीचच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटातील अडीच तोळे सोने व सुमारे ६५ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. त्यानंतर त्यांनी राजेंद्र मन्साराम इंगळे यांच्या घरातून १ तोळे सोने आणि १५ हजार रुपये रोख रक्कम चोरली. रेखाबाई पवार यांच्या घरात देखील चोरी झाली. एकूण २५ हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पळ काढला आहे.

Malegon News
Electricity Theft: तीन महिन्यात १३१ कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस

चोरी झाली तेव्हा घरामध्ये कोणीही नव्हते. तिन्ही घरे रिकामी होती. डॉ. कैलास इंगळे आणि राजेंद्र इंगळे हे आपल्या कुटुंबाबरोबर एका विवाह सोहळ्यात गेले होते. मालेगाव येथे त्यांच्या नात्यातील एका व्यक्तीचे लग्न होते. तसेच रेखाबाई पवार पाचोरा येथे कामानिमित्त गेल्या होत्या. एकाच वेळी तीन घरं रिकामी भेटल्याने चोरट्यांनी मोठ्या सफाईने तिन्ही घरांमधून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे.

Malegon News
Theft: जेलमधून सुटताच बंद घरामध्ये केली चोरी

कैलास इंगळे लग्नसमारंभ झाल्यावर घरी परतले तेव्हा घराची दशा पाहून त्यांना धक्का बसला. आपल्या घरी (Home) चोरी (Theft) झाल्याचे समजताच त्यांनी आजूबाजूच्या व्यक्तींना सांगितले. तेव्हा आणखीन दोन घरांमध्ये चोरी झाल्याचे समले. त्यानंतर या सर्वांनी पेलिसांत तक्रार दाखल केली. सध्या पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. एकाच रात्री तीन घरे फोडल्याने इतर नागरिक देखील भयभीत झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com