वीजचोरी (Electricity Theft) व विजेचा गैरवापर आणि इतर अनियमिता आटोक्यात आणण्यासाठी तसेच वीजचोरांविरूध्द अतिजलद कारवाई करण्यासाठी विभागीय स्तरावर आणखी दहा नवीन भरारी पथकांची स्थापना करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत. त्यानुसार सदर धडक मोहिम राबविली जात आहे.
५४ कोटी १६ लाखाची दंड वसूली
सध्या महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागात ६३ भरारी पथकांसह आठ अंमलबजावणी युनिटस कार्यरत आहेत. या भरारी पथकांनी चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल, मे आणि जून या प्रथम तिमाहीत वीजचोरीची २३९.५८ दशलक्ष युनिटच्या वीजचोरीची तब्बल २ हजार ६२५ प्रकरणे उघडकीस आणून वीजचोरांकडून सुमारे ५४ कोटी १६ लाख ६६ हजारांचा दंड वसूल केला आहे. उर्वरित बिलांची रक्कमही लवकरात लवकर संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे.
वर्षभरात १३ हजाराहून अधिक प्रकरणे उघडकीस
मागिल तीन आर्थिक वर्षात महावितरणच्या भरारी पथकांनी वीजचोरांवर अंकूश लावण्यात यश मिळविले असून २०१९-२० या आर्थिक वर्षात ९२५० प्रकरणांत ९७.५० कोटींची वीजचोरी उघडकीस आणली. तर २०२०-२१ या आर्थिक वर्षात कोरोना महामारीत शासनाच्या विविध निर्बंधामुळे वीजचोरांविरूध्द कारवाया करण्यावर मर्यादा आल्या असल्या तरी ७१६९ एवढ्या मोठ्या संख्येने वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली. यात ८७.४९ कोटींची वीजचोरी पकडण्यात आली. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात वीजचोरीची तब्बल १३ हजार ३७० प्रकरणे उघडकीस आणण्यात भरारी पथकांना यश आले. त्यात वीजचोरीची रक्कम २६४.४६ कोटी एवढी आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.