तक्रार देण्यासाठी आलेल्या युवकाला PSI ची मारहाण, खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची दिली धमकी

पोलिसांनी कुठलीही तक्रार न घेता त्यांना थेट पट्ट्याने मारहाण केली तसेच तुला खोट्या गुन्ह्यात अडकवेन अशी धमकीही दिली.
Crime News
Crime NewsSaam TV
Published On: 

अकोला : अकोल्यातील अकोट तालुक्यातील देवरी येथील शिवशंकर गायकवाड यांचा त्यांचा भावाशी घरगुती वाद आहे. या वादासंदर्भात ते दहीहंडा पोलिस ठाण्यात (Dahihanda Police Station) तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी कुठलीही तक्रार न घेता त्यांना थेट पट्ट्याने मारहाण केली तसेच तुला खोट्या गुन्ह्यात अडकवेल अशी धमकीही दिली. या मारहाणीमुळे माझ्या पायावर आणि पाठीवरती वण उठल्याच युवकाने सांगितलं आहे.

Crime News
Crime News: 'मला माझ्या बायकोपासून वाचवा' नवऱ्याची पोलिसांना विनंती

या संदर्भात पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली परंतु त्या तक्रारीवर ही कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आता दहीहंडा पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी रघुनाथ हिवाळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार शिवशंकर गायकवाड यांनी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.