Gondiya Police
Gondiya PoliceSaam TV

धक्कादायक! हृदयविकाराच्या झटक्याने न्यायालयाच्या शिवारातच पोलिसाचा मृत्यू

Gondiya Police : हृदयविकारामुळे चंद्रशेखर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
Published on

गोंदिया : तुरुंगातील आरोपींना न्यायालयात पेशीवर आणणाऱ्या एका सहाय्यक फ़ौजदाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. गोंदिया (Gondiya) शहरात ही दुर्देवी घटना घडली आहे. चंद्रशेखर ब्रिजलाल बिसेन असे मृत झालेल्या सहाय्यक फ़ौजदाराचे नाव आहे. चंद्रशेखर हे भंडारा जिल्हा पोलीस दलात (Bhandara Police) कार्यरत होते. मंगळवारी ते काही आरोपींना घेऊन गोंदिया येथील न्यायालयात आले होते. (The Policeman Dies Heart Attack While Onduty In Gondiya)

Gondiya Police
खेळ बेतला जीवावर! १२ वर्षांच्या मुलाचा खेळताना रुमालाचा गळफास लागून मृत्यू

चंद्रशेखर बिसेन हे गोंदियाच्या न्यायालयात आले असता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना घरी नेण्यात आले. परंतु घरी नेल्यावर त्यांची प्रकृती आणखीच खालावली. त्यानंतर त्यांना पुन्हा गोंदियाच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रथम उपचारासाठी गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हृदयविकारामुळे चंद्रशेखर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलिसांनी उत्तरीय तपासणी करून चंद्रशेखर यांचा मृतदेह कुटुंबीयांकडे सुपुर्द केला गेला आहे. कर्तव्यावर असतांना असा दुर्देवी मृत्यु झाल्याणे पोलीस विभागासह परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com