Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजांच्या त्या विधानाबाबतची सुनावणी पुढे ढकलली

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj ) पुत्ररत्न प्राप्तीबाबत केलेल्या विधानाप्रकरणावरील सुनावणी पुढं ढकललीये.
Indurikar Maharaj
Indurikar MaharajSaam Tv
Published On: 

औरंगाबाद : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) पुत्ररत्न प्राप्तीबाबत केलेल्या विधानाप्रकरणावरील सुनावणी पुढं ढकललीये. आता पुढील सुनावणी 27 जानेवारीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे.

Indurikar Maharaj
MNS: इंदुरीकर महाराजांच्या किर्तनास हजारोंची गर्दी; मनसे जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी एका कीर्तनातून पुत्ररत्न प्राप्तीच्या संदर्भाने जाहीरपणे विधान केले होते. त्याविरोधात संगमनेर (Sangamner) येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्याध्यक्ष अॅडव्होकेट रंजना गवांदे यांनी नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली होती.

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजे पीसीपीएनडीटी ऍक्टनुसार संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदानंतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याच्या कलम 28 नुसार तक्रार केली.

Indurikar Maharaj
'...म्हणून मला कोरोना झाला नाही'; इंदुरीकर महाराजांनी सांगितलं कारण

न्यायालयाने इंदुरीकर महाराज यांना समन्स (Summons) काढण्याचे आदेश दिले. त्याविरोधात इंदुरीकरांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने पुनर्विलोकन अर्ज मंजूर करत प्रथम वर्ग न्यायालयाचा आदेश रद्द केला. या विरोधात रंजना पगारे - गवांदे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.