राज्यातील जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आल्या होत्या.
राज्यातील जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार
राज्यातील जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणारSaam tv news
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई : राज्य सरकारने कोरोना विषाणू (Corona virus) महामारीच्या (Epidemic) पार्श्वभुमीवर सर्वच सरकारी आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली होती. मात्र आता राज्यसरकारच्या सहकार विभागाने राज्यातील जिल्हा बँकांची निवडणूक (District Bank Election) प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या (Co-operative society) निवडणूका ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आल्या होत्या. आता राज्यातील जवळपास २५ जिल्ह्यातील कोरोना निर्बंध शिथील केल्याने येथील याठिकाणी जिल्हा सहकारी बॅंकांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. (The election process of district banks in the state will begin)

राज्यातील जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार
Monsoon: विदर्भात विजांचा कडकडाट; 11 जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

राज्याच्या सहकार विभागाचे कार्यसन अधिकारी अनिल चौधरी (Anil Chaudhary) यांनी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनामुळे राज्यातील 31 पैकी 13 जिल्हा बँकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. कोरोनामुळे अनेक जिल्हा बँकांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नव्हत्या. काही जिल्हा बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपून देखील पंधरा महिन्यांपेक्षा जास्त वेळ झाला आहे. कोरोनामुळे सहकार विभागाने ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या होत्या. आता जिल्हा बँकांच्या निवडणुका ३१ ऑगस्टनंतर तातडीने घेता याव्यात यासाठी प्रारुप मतदार याद्या तयार करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. जिल्हा बँकांची प्रारुप मतदार यादी तयार करायला वेळ लागत असल्याने सहकार विभागाने आदेश काढले आहेत.

दरम्यान एप्रिल महिन्यात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने या संस्थांच्या निवडणुकांचे जिल्हा निवडणूक आराखडे तयार केले आहेत. राज्यात २ लाख ५८ हजार ७८६ सहकारी संस्था आहेत. त्यापैकी ४५ हजार २७६ संस्थांच्या निवडणुका या प्रलंबित असून या सहकारी संस्थांची अ, ब, क आणि ड अशी वर्गवारी करण्यात आली आहे. अ वर्गामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राज्यस्तरीय शिखर किंवा संघीय सहकारी संस्था, सहकारी सूत गिरण्या आदींचा समावेश आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com