पुसद, आर्णी येथील लघुपाटबंधारे विभाग बंद होणार; शेतकऱ्यांना बसणार फटका

ही कार्यालये यवतमाळ जिल्हा प्रकल्प बांधकाम विभागाला हलविण्यात येत असून या स्थानांतरणाचा फटका लाभार्थी शेतकऱ्यांना बसणार आहे.
पुसद, आर्णी येथील लघुपाटबंधारे विभाग बंद होणार; शेतकऱ्यांना बसणार फटका
पुसद, आर्णी येथील लघुपाटबंधारे विभाग बंद होणार; शेतकऱ्यांना बसणार फटकासंजय राठोड
Published On

संजय राठोड

यवतमाळ - राज्य शासनाच्या जलसंपदा मंत्रालयाने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व आर्णी येथील लघु पाटबंधारे विभागाची पाच कार्यालये आज एक ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय अखेर घेतला आहे. ही कार्यालये यवतमाळ जिल्हा प्रकल्प बांधकाम विभागाला हलविण्यात येत असून या स्थानांतरणाचा फटका लाभार्थी शेतकऱ्यांना बसणार आहे. या बंद करण्यात येणाऱ्या कार्यालयामध्ये लघु पाटबंधारे विभाग पुसद व निम्नपैनगंगा पुनर्वसन विभाग आर्णी या विभागांचा समावेश आहे. (The Department of Minor Irrigation has decided to close five offices; farmers warn to protest)

पुसद विभाग अंतर्गत लघु पाटबंधारे उपविभाग क्रमांक २ पुसद व उपविभाग क्रमांक ३ आर्णी तर निम्न पैनगंगा पुनर्वसन विभाग आर्णी अंतर्गत उपविभाग क्रमांक एक आर्णी, उपविभाग क्रमांक दोन पुसद व उपविभाग क्रमांक ३ आर्णी या पाच कार्यालयांचे कामकाज बंद करून या कार्यालयातील कामे यवतमाळ मुख्य कार्यालयात वर्ग करण्यात येणार आहे. तसेच अभियंते व कर्मचारी यांना नव्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात येईल.

हे देखील पहा -

पुसद व आर्णी येथील लघु पाटबंधारे बंद करण्याच्या जलसंपदा विभागाचा हा निर्णय महागाव, उमरखेड, पुसद तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांवर अन्याय करणारा हा निर्णय आहे. सदर कार्यालय बंद होत असल्यामुळे विविध योजनांसाठी लागणारे कागदपत्रे आणि प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आता शेतकऱ्यांना २०० किलोमीटरचे अंतर पार करून यवतमाळच्या चकरा माराव्या लागणार आहेत. सदर आदेशामुळे तिन्ही तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये असंतोष धगधगत असून कार्यालयांचे स्थानांतर झाल्यास उग्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com