शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू...

देऊळगाव राजा तालुक्यामधील वाकी बुध्रुक गावा जवळच्या शेततळ्यात पोहायला गेले.
शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू...
शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू... संजय जाधव
Published On

संजय जाधव

बुलढाणा : देऊळगाव राजा Deulgaon Raja तालुक्यामधील वाकी बुध्रुक Waki Budruk गावा जवळच्या शेततळ्यात पोहायला, गेलेल्या २ मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वाकी बुद्रुक या ठिकाणी घडली आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर वाकी गावासह बनसोडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. The death of 2 Water children by drowning

या घटनेमुळे समाजमन हेलावून गेले आहे. दरम्यान अंढेरा Andhera पोलिसांनी Police याबाबत माहिती दिली आहे. देउळगाव राजा तालुक्यामधील वाकी बुद्रुक येथील मदन आप्पाजी काकड यांच्या शेतात मोठे शेततळे बांधलेले असून, गावातील युवक सदर शेततळ्यात पोहण्यासाठी जातात. परिसरातील अनेक मुले व युवक सदर शेततळ्यात पोहण्याचा आनंद घेत होते.

हे देखील पहा-

शाळांना सुटी असल्याने, अनेक मुले पोहत असताना शेततळ्यातील गाळात पाय अडकून १ मुलगा पाण्यात बुडत होता, ते इतर युवकांनी बघितले आणि त्याला वाचवण्यासाठी काही मुलांनी झेप घेतली. यादरम्यान, आरडाओरड केल्याने जवळच्या शेतात काम करत असलेले २ युवक शेततळ्याच्या दिशेने धावले. तोपर्यंत २ युवक पाण्यात बुडाले होते. The death of 2 Water children by drowning

शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू...
तलावात बुडून एकाच कुटुंबातील तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

तिघांना त्यांनी शेततळ्या बाहेर ओढून आणले, नंतर पाण्याखाली बुडालेल्या २ मुलांना बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेत सोहम परमेश्वर बनसोडे (वय-१२) त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अमरदीप शंकर बनसोडे (वय- १४) यास देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु, डॉक्टरांनी तपासाअंती त्यांना मृत घोषित केले होते.

२ मृतक एकाच कुळातील असल्याने, नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात hospital गर्दी केली होती. हृदय पिळवटून टाकणाऱ्या सदर घटनेमुळे नातेवाईकांनी एकच कल्लोळ केले, या दुर्दैवी घटनेने वाकी बुद्रुक सह बनसोडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. The death of 2 Water children by drowning

Edited By Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com