भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ला प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून हल्लाबोल; म्हणाले, हे बिथरलेले...

शिवसेना (Shivsena) नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी रात्री हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Bhaskar Jadhav News
Bhaskar Jadhav News Saam TV
Published On

भूषण शिंदे -

मुंबई: शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या घरावर झालेला हल्ला निषेधार्ह असून ते जे बोलले ते ऐकलं पाहिजे. मात्र, हे लोक घाबरेले, बिथरलेले आहेत त्यामुळे असली कृत्य केली जातायत असं म्हणत शिवसेना नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

शिवसेना (Shivsena) नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी रात्री हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कारण भास्कर जाधव यांच्या घराबाहेरील आवारात दगड व अन्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राणे विरुद्ध जाधव असा असा संघर्ष निर्माण झाला असतानाच या घटनेमुळे आणखी काही नवा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाहा व्हिडीओ -

अशातच आता आमदार भास्कर जाधव यांची सुरक्षा व्यवस्था काढल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. भाजपा विरोधातील वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाल्याची चर्चा आहे याच पार्श्वभूमीवरुन किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. पेडणेकर म्हणाल्या, भास्कर जाधव यांच्या घरावर झालेला हल्ला निषेधार्ह असून ते जे बोलले ते ऐकलं पाहिजे.

मात्र, हे लोक घाबरेले, बिथरले आहेत त्यामुळे असली कृत्य केली जात आहेत. तुम्ही एका पक्षप्रमुखाला काहीही बोलता, संतोष बांगर काय बोलतात ते देखील ऐकलं पाहीजे, असं म्हणत शिवसेना नेत्या माजी महापौर यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिवाय गेले तीन वर्ष ज्या स्वायत्त संस्था होत्या त्याचा पण वापर केला जात आहे.

Bhaskar Jadhav News
Congress News President : मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

आमचे चिन्ह गोठवले, आम्हाला मशाल मिळाली तरी देखील आम्ही घाबरलो नाही. त्यामुळेच असे प्रकार केले जात आहेत. शिवाय विवरण पत्रामध्ये सगळी माहिती असते. हल्ली कोणीही कोणाची माहिती मिळवू शकतं, सगळ्यांचे टार्गेट फक्त उद्धव ठाकरे आहेत. मी इतर ठाकऱ्यांबद्दल बोलणार नाही कारण ते मांडीला मांडी लावून बसले आहेत असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना देखील टोला लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com