Congress News President : मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

मल्लिकार्जुन खरगे यांना गांधी घराण्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांचा आधीपासूनच पाठिंबा होता.
Mallikarjun Kharge
Mallikarjun KhargeSaam
Published On

नवी दिल्ली: काँग्रेसला (Congress) तब्बल २४ वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) काँग्रेसचे नवे अध्यक्ष असतील. त्यांनी शशी थरुर यांचा पराभव केला आहे.

Mallikarjun Kharge
Pune News : काँग्रेस कार्यकर्ते दाखवत होते काळे झेंडे, सुप्रिया सुळेंनी गाडीतून खाली उतरत विचारलं कारण, तेव्हा समजलं...

देशभरातील ४० केंद्रांवर उभारलेल्या बूथवर मतदान करून मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यातील ९८०० हून अधिक काँग्रेस नेत्यांनी आपली निवड केली आहे. नव्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत मल्लिकार्जुन खरगे हे सुरुवातीपासूनच पुढे होते. याचे मोठे कारण म्हणजे खरगे यांना गांधी घराण्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा होता. (Latest News)

कॉंग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत मल्लीकार्जून खरगे यांचा विजय झाल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांना खरगे यांना ट्वीट करून शुभेच्छा दिल्या.

कॉंग्रेसचे अध्यक्ष होणे हा सर्वात मोठा सन्मान आणि मोठी जबाबदारी आहे. खर्गेजी ह्या कार्यात सर्वस्वी यशस्वी व्हावेत अशी माझी इच्छा आहे. एक हजाराहून अधिक सहकार्‍यांचा पाठिंबा मिळणे आणि काँग्रेसच्या अनेक हितचिंतकांच्या आशा आणि आकांक्षा भारतभर घेऊन जाणे, हा बहुमान आहे, असं थरुर यांनी म्हटलं.

काँग्रेससाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. कारण तब्बल २४ वर्षांनंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील नेता काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मिळाला आहे. याआधी सीताराम केसरी हे काँग्रेस घराण्याबाहेरील काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत.

Mallikarjun Kharge
Nashik Video: कोट्यवधींची आलिशान लॅम्बोर्गिनी कार बनली 'दे धक्का' गाडी; कारमालकाची फजिती पाहून सगळेच चक्रावले

सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक

काँग्रेस पक्षाच्या १३७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदासाठी १९३९, १९५०, १९७७, १९९७ आणि २००० मध्ये निवडणुका झाल्या होत्या. यावेळी तब्बल २२ वर्षांनंतर अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यांनी सांगितले की, या निवडणुकीनंतर 24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरचा नेता देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवडला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com