विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मोठी घसऱण झाली... त्यामुळे राज्यसभेची एकच जागा निवडून येण्याइतकं महाविकास आघाडीचं संख्याबळ आहे... पवारांची पुन्हा राज्यसभेवर जाण्याची इच्छा असल्यामुळे त्यांच्यासाठी जागा सोडण्याची आग्रही भूमिका ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी वारंवार मांडलीय. मात्र रोटेशनच्या मुद्यावर बोट ठेवत ठाकरेसेनेच्याच आमदार आदित्य ठाकरेंनी या जागेवर दावा ठोकलाय. त्यामुळे ठाकरेसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आलेत..
पवार राज्यसभेची निवडणूक लढवणार की नाही... याबाबत त्यांनी अजूनही स्पष्ट भूमिका मांडली नाही..मात्र पवारांसाठी राऊत आग्रही आहेत.. मात्र पवारांसोबतच प्रियंका चतुर्वेदींचीही टर्म संपतेय.. त्यामुळेच पवारांऐवजी प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आदित्य ठाकरे आग्रही असल्याची चर्चा रंगलीय... आणि त्यामुळेच राऊतांनी आता पक्षाचा निर्णयाशी बांधील असल्याचं सांगितलं असलं तरी पवारांनी इच्छा व्यक्त केल्यास त्यावर चर्चा करावीच लागणार असल्याचं सांगत ठाम भूमिकाही मांडलीय.
राज्यसभेच्या 7 जागांसाठी 41 मतांचा कोटा असला तरी कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून येण्याची शक्यता आहे...सध्या भाजपचं 131, शिंदेसेनेचे 57, दादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीचं संख्याबळ 40 इतकं आहे... तर मित्रपक्षांची मदत घेतल्यानंतर महायुतीचे 6 खासदार निवडून येण्याची शक्यता तर महाविकास आघाडीत ठाकरेसेनेचे 20, काँग्रेसचे 16 तर पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत.. त्यामुळे महाविकास आघाडीचा 1 खासदार निवडून येण्याची शक्यता
आता संख्याबळानुसार महाविकास आघाडीत एकच खासदार निवडून येण्याची शक्यता आहे.. त्यातच आता पवारांसाठी राऊत आग्रही असले तरी आदित्य ठाकरेंनी चतुर्वेदींचं नाव पुढे केल्यास ठाकरेसेनेतील मतभेद तीव्र होण्याची शक्यता आहे... त्यामुळे पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार का? याचीच उत्सुकता आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.