रोहित कदम, साम टीव्ही
6 खासदार फुटल्यानंतर ठाकरेसेनेमध्ये अस्थिरता निर्माण झालेली असताना ठाकरेसेनेतील दोन बड्या नेत्यांमधली धुसफुस समोर आलीय. ते दोन बडे नेते म्हणजे गुहागरचे ठाकरेसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर . त्याला निमित्त ठरलं शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी भास्कर जाधव यांनी केलेलं वक्तव्य.
हे वक्तव्य मिलिंद नार्वेकरांच्या चांगलंच जिव्हारी लागलं. एकीकडे सहा फुटीर खासदारांचा पक्षप्रवेश होत असताना आणि ठाकरेसेनेची आमदार-खासदारांची बैठक होत असताना मिलिंद नार्वेकरांनी केलेली पोस्ट आता चांगलीच चर्चेत आलीये. या पोस्टमध्ये
नैराश्य!
माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण भास्कर जाधवांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे!
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीसांनीही भास्कर जाधवांना खोचक टोला लगावलाय..
मात्र, सोशल मीडियावरची ही पोस्ट आणि त्यात दाखवलेला हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भास्कर जाधवांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केलाय. दरम्यान, सहा खासदारांच्या फुटीनंतर ठाकरेसेनेत आलबेल नसल्याचं समोर आलंय. अशातच आता ठाकरेसेनेतील दोन नेत्यांमधली ही धुसफुस अशा पध्दतीने समोर आल्यानं याचा परिणाम ठाकरेसेनेतील इतर आमदारांवर होण्याची शक्यता आहे. खासदारांनंतर शिंदेसेनेकडून आमदार फुटीचा दावा केला जात असताना हा अंतर्गत वाद शमवण्याचं मोठं आव्हान उद्ध्व ठाकरेंसमोर असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.