कोकणात ठाकरेसेना नामशेष? कोकणात ठाकरेसेनेला गळती सुरूच

Internal Rift and Defections Shake Thackeray Sena in Coastal Belt: कोकणात विधानपरीषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ठाकरे सेनेला मोठा झटका बसलाय... यामुळे मात्र ठाकरेसेनेच्या कोकणातल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात ठाकरेसेनेसमोर काय आव्हानं आहेत? पाहूया एक रिपोर्ट...
Thackeray Sena leaders face a political setback in Konkan as internal conflicts and defections weaken the party’s traditional stronghold.
Thackeray Sena leaders face a political setback in Konkan as internal conflicts and defections weaken the party’s traditional stronghold.saam tv
Published On

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परीषदेच्या निवडणुकीत कोकणात ठाकरेसेनेला मोठा झटका बसला आहे. माजी आमदार आणि ठाकरेसेनेचे उमेदवार बाळ माने यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पक्षावर नामुष्की ओढवली. मात्र यामुळे पुन्हा एकदा ठाकरेसेनेतल्या कोकणातल्या नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ठाकरेसेनेतून घालवण्यासाठी विनायक राऊतांनी आपली सुपारी घेतल्याचा आरोप बाळ मानेंनी केलाय. यावर माजी खासदार विनायक राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय..

२०२४ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणूक तसेच २०२६ मधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाचं पानीपत झालं. मातब्बर नेत्यांचे पक्षांतर, अंतर्गत वाद आणि महायुतीची वाढती ताकद यामुळे कोकणात ठाकरेसेनेची पकड सैल झाल्याचे दिसून येतय.

आपण कोकणातील ठाकरेसेनेची राजकीय ताकद पाहूया...

कोकणात ठाकरेसेना नामशेष ?

पक्षनिहाय आमदारांची सख्या

रायगड

भाजप - 3

शिंदेसेना - 3

राष्ट्रवादी काँग्रेस (AP) - 1

ठाकरेसेना - 0

रत्नागिरी

शिंदे सेना - 3

ठाकरेसेना - 1

राष्ट्रवादी काँग्रेस (AP) - 1

सिंधुदुर्ग

भाजप - 1

शिंदेसेना - 2

ठाकरेसेना - 0

-------------------------

तर लोकसभेतही ठाकरेसेनेचं अस्तित्व संपल्यात जमा आहे

कोकणात ठाकरेसेना नामशेष ?(HDR)

खासदारांची संख्या

भाजप - 1

राष्ट्रवादी (AP) - 1

ठाकरेसेना - 0

म्हणजेच कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव हे ठाकरेसेनेचे एकमेव आमदार आहेत.

ठाकरे सेनेचे एकेक नेते पक्ष सोडून जाऊ लागले आहेत. राजापूरमधून तीन वेळा आमदार राहिलेले राजन साळवी विधानसभेतील पराभवाननंतर आणि एसीबीचा ससेमिरा मागे लागल्याने शिंदेसेनेते गेले. त्यावेळी त्यांनीही विनायक राऊतांवर निशाणा साधला होता. एकेकाळी ठाकरेंचं कोकणावर एकहाती वर्चस्व होतं. पण आता ती जादू राहिली नाही. उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव किंवा आदित्य ठाकरेंनी एकही कोकणचा दौरा केलेला नाही. प्रभावी सभा नाही. ज्वलंत प्रश्नावर आंदोलन नाही. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्ता पक्षापासून दुरावला गेला आहे. ठाकरेंची कोकणातील माणसाशी नाळ तुटल्याचं बोललं जातंय. त्यामुळे 2029 च्या विधानसभा निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरेसेना काय रणनिती आखते ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com