'भाजपचा वॉच, नगरसेवकांचे फोन टॅप'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Phone Tapping Controversy : फोन टॅपिंगवरून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. खासदार संजय राऊतांनी भाजप आणि शिंदेसेनेवर नेमका काय आरोप केलाय? पाहूयात.
Phone Tapping Controversy
Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut addressing media over phone tapping allegations against BJP and Shinde Sena.saam tv
Published On
Summary
  • फोन टॅपिंगवरून पुन्हा राजकीय खळबळ

  • संजय राऊतांचा भाजप आणि शिंदेसेनेवर गंभीर आरोप

  • महापौर पदासाठी सुरू असलेल्या हॉटेल पॉलिटिक्सचा संदर्भ

ऐकलतं. राज्यात पुन्हा एकदा फोन टॅपिंगवरून राजकीय वातावरण चांगलाच तापलयं आणि याला कारण ठरलयं. शिंदेसेनेकडून दबावाचं राजकारण करत महापौर पदासाठी सुरु असलेलं हॉटेल पॉलिटिक्स. आणि याचं हॉटेल पॉलिटिक्सचा संदर्भ देत राऊतांनी भाजपवर नगरसेवकांच्या फोन टॅपिंगचा आरोप केलाय.

Phone Tapping Controversy
Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

राऊत फक्त फोन टॅपिंगचे आरोप करून थांबले नाहीत तर त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत वादाची ठिणगी का पडलीय हे ही सांगितलंय.

'भाजपकडून नगरसेवकाचं फोन टॅपिंग'

शिंदेसेना भाजपकडून महत्त्वाची पदे पदरात पाडून घेण्यासाठी ब्लॅकमेलिंग सुरु

सर्वाधिक आर्थिक व्यवहार स्थायी समितीच्या माध्यमातून होतात

त्यामुळे महापौरपदाऐवजी स्थायी समितीत शिंदेसेनेचा जास्त रस

भाजप कार्यकर्त्यांना नगरसेवकांवर लक्ष ठेवण्याचे आदेश

10 दिवस नगरसेवकांना मुंबई न सोडण्याचे फर्मान

भाजप आणि शिंदेसेनेच्या नगरसेवकांचे फोन टॅपिंग

Phone Tapping Controversy
Mumbai : भाजप मुंबईत महापौरपदावर ठाम, शिंदेसेनेला घाम? आता उपमुख्यमंत्री शिंदेंची नवी रणनीती काय? VIDEO

याआधीही राज्यात तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप विरोधकांनी केलेला होता..त्यानंतर राऊतांनी थेट सत्ताधारी भाजप वरच आरोप केलाय. . मात्र हे आरोप भाजपनं फेटाळून लावलेत. दरम्यान फोन टॅपिंगच्या प्रकरणावरून वादळ उठलेलं असताना राऊतांच्या आरोपांची चौकशी होणार का? सत्तास्थापनेच्या या गुंतागुंतीत नेमका कुणाचा महापौर बसणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com