Mumbai : भाजप मुंबईत महापौरपदावर ठाम, शिंदेसेनेला घाम? आता उपमुख्यमंत्री शिंदेंची नवी रणनीती काय? VIDEO

Mumbai Politics : मुंबईत महापौरपदासाठी भाजप कुठलीच तडजोड करणार नाहीय...मात्र, नो कॉम्प्रमाईजच्या या धोरणात शिंदेसेनेनं कोणती नवी रणनीती आखलीय? महापौरपदाचा मुहूर्त कधी आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Devendra Fadnavis and Eknath Shinde  news
Devendra Fadnavis and Eknath Shinde Saam Tv
Published On

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 89 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपनं आता थेट 'मिशन महापौर' हाती घेतलयं....गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेचं वर्चस्व असणाऱ्या मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसवण्याचा मुहूर्त ठरलाय...एकीकडे शिंदेसेनेच्या अडीच वर्षांसाठी महापौर पदाच्या मागणीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज्यातील भाजप नेते नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पदभार समारंभासाठी दिल्लीत पोहचलेत त्यामुळे आता मुंबईच्या महापौर पदासंदर्भात भाजप हायकमांडनं नेमके काय आदेश दिलेत? पाहूयात...

Devendra Fadnavis and Eknath Shinde  news
आई महापालिकेत सफाई कामगार; आता त्याच पालिकेत मुलगा नगरसेवक म्हणून बसणार

महापौरपदासाठी मुहूर्त ठरला

महापौरपदावर भाजपचाच हक्क असल्याचे शिंदेसेनेसमोर ठामपणे मांडा

कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखतानाच मित्रपक्षांशी कटुता टाळा

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी कोणतीही तडजोड करू नका

30 जानेवारीला भाजपचा महापौर मुंबईची सूत्र सांभाळेल

दुसरीकडे मुंबई महापालिकेत अडीच वर्षांसाठी महापौरपद मिळालं नाही तर शिंदेसेना भाजपला शह देण्याच्या तयारीत असल्याचीही जोरदार चर्चा आहे. आणि त्यासाठी कल्याण डोबिवली तसंच उल्हासनगर महापालिकेत शिंदेसेना अडून बसेल. या दोन महापालिकांमध्ये शिंदेसेना भाजपची कशी कोंडी करू शकते पाहूयात...

Devendra Fadnavis and Eknath Shinde  news
ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का; बड्या नेत्याने हाती धरलं शिवसेनेचे 'धनुष्यबाण'

उल्हासनगर महापालिकेत भाजपकडे 37 तर शिंदेसेनेकडे 36 जागा आहेत... त्यामुळे शिंदेसेनेनं उल्हासनगर महापालिकेत महापौर बसवण्यासाठी थेट 2 जागा असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीशी युती कऱण्यासंदर्भात चर्चा सुरु केलीय...

तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपनं 50 तर शिंदेसेनेनं 53 जागांवर विजय मिळवलाय...त्यामुळे शिंदेसेना महापौर पद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरेसेनेच्या 11 नगरसेवकांनी पक्षांतर करावं यासाठी प्रयत्न करतेय... त्यामुळे या महापालिकांमध्ये शिंदेसेना भाजपची कोंडी करु शकतो..

Devendra Fadnavis and Eknath Shinde  news
एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या, घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह; प्रत्येकाच्या डोक्यात झाडल्या गोळ्या

दरम्यान ठाणे महापालिकेतही भाजपला 2 वर्षांसाठी महापौरपद हवं असल्यानं स्थानिक नेत्यांमध्ये महापौरपदावरून चांगलाच वाद पेटलाय...त्यामुळेच मुंबईतील सत्तास्थापनेच्या गोळाबेरजेचा थेट परिणाम राज्यातील इतर महापालिकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे... आता भाजप आणि शिंदेसेनेतील हा अंतर्गत वाद कसा शमणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com