Chandrakant Khaire News : राज्यात भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात लोकसभेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. भाजपने आतापासून राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघात बैठकांचा सपाटा लावला आहे. तर दुसरीकडे भाजप कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा पराभव करण्याच्या प्रयत्नात आहे, असा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. (Latest Marathi News)
ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपच्या राजकारणावर भाष्य केलं. चंद्रकांत खैरे म्हणाले, 'भाजपा लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गेम करणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना लोकसभा निवडणुकीसाठी पाडण्यासाठी सुद्धा भाजप प्रयत्न करत आहे. तर भाजपमधील कार्यकर्ते देखील मला भेटून नाराजी व्यक्त करत आहेत. शिंदेंच्या मंत्र्यांमुळे भाजपाची प्रतिमा मलिन होत आहे, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले, 'औरंगाबादची जागा ही शिवसेनेचीच आहे. कितीही गद्दारांना येऊ द्या. गद्दार निवडून येणार नाहीत. जे.पी नड्डा यांना येऊ द्या आणि सभा घेऊ द्या, त्यामुळे शिवसेनेला काही फरक पडणार नाही, असंही ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे म्हणाले.
दरम्यान, खैरे यांनी ऑनलाइन ईव्हीएम मशीनवर पद्धतीवर शंका उपस्थित केली. 'ईव्हीएम मशीन वर मतदान कोणाला केलं तर कोणाला जातं हे सिद्ध झालेले मात्र कोणी बोलायला तयार नाही. ईव्हीएम मशीन बंद होऊन बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला हवी ही शिवसेनेची भूमिका आहे. इलेक्शन कमिशनने दुष्ट विचार करू नये. भाजपाला काहीही करून मोदींना निवडून आणायचे आहे. त्यासाठी ईव्हीएमचे डावपेच सुरू झाले आहे, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.