आज पाऊल उचललंय, पुढे हात उचलला जाईल', ठाकरेंचा इशारा

Raj and Uddhav Thackeray Warn Centre Over SIR : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी देशभरात आंदोलनं केली जाताहेत. तर मुंबईत ठाकरे बंधूंनी गर्जना मोर्चा काढला. यावेळी ठाकरे बंधूंनी बॅलेट पेपरची मागणी करत केंद्र सरकारला गंभीर इशारा दिलाय... भाजपनं मात्र ठाकरे बंधूंच्या मोर्च्याची खिल्ली उडवलीये... पाहूयात या रिपोर्टमधून...
THACKERAY BROTHERS GARJANA MORCHA
THACKERAY BROTHERS GARJANA MORCHAsaam tv
Published On: 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावरून ठाकरे बंधू जोरदार हल्लाबोल केला. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काढलेल्या मोर्च्यानंतर झालेल्या सभेत महाराष्ट्रातील SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणीच राज ठाकरेंनी केली. एव्हंढच नव्हे तर लोकसभा निवडणुकीनंतर लाखोंच्या संख्येनं मतदार कसे वाढले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तर दुसरीकडे, उद्धव ठाकरेंनीही निवडणूक आयोगासह सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. SIR प्रक्रियेतून देशात 13 कोटी मतदार वगळल्याचा दावा ठाकरेंनी केलाय. तसंच, आयोगाच्या कारभारावर आक्षेप घेताना सरकारला गंभीर इशारा दिलाय.

तर दुसरीकडे, उद्धव ठाकरेंनीही निवडणूक आयोगासह सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. SIR प्रक्रियेतून देशात 13 कोटी मतदार वगळल्याचा दावा ठाकरेंनी केलाय. तसंच, आयोगाच्या कारभारावर आक्षेप घेताना सरकारला गंभीर इशारा दिलाय.देशभरात राजकीय पक्ष, विविध विद्यार्थी संघटना आणि CJPकडून निवडणूक आयुक्त झानेश कुमार यांच्या विरोधात आधीच एल्गार पुकारण्यात आला असतानाच, आता राज्यातही ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात विरोधक एकवटलेत. त्यामुळे येत्या काळात ज्ञानेश कुमार आणि SIR प्रक्रियेविरोधातील लढाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com