Maharashtra politic: ठाकरेंची युती, भाजपला भीती?

Thackeray Brothers Alliance: ठाकरे बंधूंच्या युतीवरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलयं. महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधूंची युती झाली तर भाजपला पालिका निवडणुकीत आणखी जोर लावावा लागणारेय. मात्र भाजपला ठाकरेंच्या युतीची भीती का आहे? ठाकरे बंधू एकत्र आल्यास काय परिमाण होतील? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
 उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेsaam tv
Published On

ऐकलंत.. ठाकरे बंधुंवर प्रेम करणाऱ्यांना यापेक्षा अजून मोठा पुरावा काय हवा? 20 वर्षांपुर्वी दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र येणारेत. होय तसं आम्ही नाही त्यांनीच संकेत देत म्हटलंय. ठाकरे ब्रँण्डसाठी अखेर ठाकरे बंधू मैदानात उतरले असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण नुकत्याच झालेल्या निवडणूकांमध्ये दोन्ही ठाकरेंची धूळधाण झाली. राज ठाकरेंचा मुलासह सगळ्या जागांवर दारुण पराभव झाला तर उद्धव ठाकरेंकडून पक्ष चिन्ह सगळंच गेलं.

 उद्धव ठाकरे
Zeeshan Siddique: डी गँगची झिशान सिद्दिकींनी जीवे मारण्याची धमकी, प्रकरण काय? पाहा व्हिडिओ

आणि म्हणूनच गेल्या 30 वर्षांपासून हातात असलेल्या मुंबई महापालिकेसोबतच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकात अस्तित्व टिकवण्यासाठी का होईना पण दोन्ही ठाकरे एकत्र येतायेत मात्र या दोन भावांच्या युतीचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात..पाहूया...

मराठी माणसाच्या राजकारणाला एक संयुक्त व्यासपीठ मिळेल.

मराठी अस्मितेचा कमकुवत झालेला मुद्दा पुन्हा बळकट होईल

ठाकरें बंधूंच्या युतीचा दोन्ही ठाकरेंना मतपेटीतून फायदा

प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिकेवर ठाकरे सेनेला वर्चस्व राखण्यात मदत

ठाकरे बंधू एकत्र येण्याचे फायदे जरूर आहेत मात्र हे मनोमिलन वाटतं तेवढं सोप्प नाही..ठाकरे सेना आणि मनसेच्या युतीसमोरील संभाव्य आव्हानं काय असू शकतात पाहूयात

युतीचं नेतृत्त्व कोण करणार

मविआतून बाहेर पडून उद्धव राज ठाकरेंसोबत युती करणार का

महाविकास आघाडीमध्ये समन्वय कसा साधणार

काँग्रेस राज ठाकरेंचं कट्टर प्रादेशिक अस्मितेचं अस्तित्व स्विकारणार का

मराठी मतांनुसार दोन्ही पक्ष मतदार संघाची विभागणी कशी करणार

एकमेकांविरोधात लढलेल्या पक्ष कार्यकर्त्यांना एकत्र कसं आणणार..

आदित्य आणि अमित एकमेकांचे नेतृत्व कसे स्विकारणार

ठाकरे बंधूंची युती सत्तेच्या सारीपाटावर वजीराची भूमिकेत असू शकते. कदाचित त्याचमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना युतीवरचा प्रश्नच विचारणं आवडलं नाही तर राज ठाकरेंचे परममित्र असल्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या आशिष शेलारांनी थेट राज ठाकरेंसोबतची मैत्री तुटल्याचं म्हटलं.

भाजपसोबत न जाण्याचे परिणाम उद्धव ठाकरेंना सहन करावे लागलेत. तर भाजप आणि किंबहुना शिंदेगटानंही राज ठाकरेंना झुलवत ठेवल्याचं निवडणूकांमध्ये पहायला मिळालं. त्यामुळे सध्या अस्तित्वाची लढाईमध्ये या दोन्ही बंधूंचा शत्रू हा एकच असल्याचं स्पष्ट दिसंतय. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकांमध्ये ठाकरे बंधू भारत जिंकायला निघालेल्या भाजपच्या स्वप्नाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये सुरुंग लावून यशस्वी होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणारेय. तुर्तास किती ही चर्चा केल्या तरी राज ठाकरे परदेशातून आल्यानंतर नेमक्या काय घडामोडी घडतात यावर महाराष्ट्रासोबतच देशाचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com