TET Scam: 'शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती ‘व्यापमं’सारखीच, २०१४-२०१९ या कालावधीत...'

कॉंग्रेसच्या बड्या नेत्याने टीईटी घोटाळ्यावरूनही सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
TET Exam Scam News
TET Exam Scam NewsSaam TV
Published On

मुंबई : राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी विरोध पक्ष सातत्याने लावून धरत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदत सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत; परंतु शिंदे-फडणवीस सरकार (Maharashtra government) शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चाही करत नाही. शेतकरी आत्महत्येविषयी हे सरकार गंभीर नाही, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Nana Patole) नाना पटोले यांनी केला.

TET Exam Scam News
पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेवर भरदिवसा कोयत्याने वार, घटना CCTV मध्ये कैद

यावेळी त्यांनी टीईटी (TET Scam) घोटाळ्यावरूनही सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. राज्यात २०१४ ते १९ या काळात झालेली नोकरी भरती ही मध्य प्रदेशातील भाजपच्या शिवराजसिंह चौहान सरकारच्या काळातील ‘व्यापमं’ घोटाळ्यासारखीच आहे, असं ते म्हणाले. विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. आम्ही विधीमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरले.

पण शिंदे-फडणवीस सरकार (Eknath Shinde Government) या विषयावर चर्चा करण्यासही तयार नाही. शेतकरी, कामगार, बेरोजगारांसह सामान्य माणसांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष नाही. राज्यातील ईडी सरकार कोणत्याच प्रश्नावर गंभीर दिसत नाही. विधीमंडळात मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरांवरून हे सरकार मस्तीत वागत असल्याचे दिसले, असे नाना पटोले म्हणाले.

TET Exam Scam News
Police Recruitment : पोलीस भरती प्रक्रियेत डमी उमेदवार; पोलिसांनी केला मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

शेतकऱ्यांना (Farmers) भक्कम आधार देण्यात हे सरकार टाळाटाळ करत असून शेतकऱ्यांना या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईपोटी बागायती जमीन व फळबागेसाठी हेक्टरी १.५ लाख रुपये तर जिरायतीसाठी हेक्टरी ७५ हजार रुपये द्यावेत, असा ठराव काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत केला आहे.

शिक्षक भरती घोटाळा ‘व्यापमं’सारखाच; चौकशी करून दोषींना शिक्षा द्या!

राज्यातील शिक्षक भरती घोटाळ्याचे मूळ हे तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळातलं आहे. फडणवीस सरकारने TET साठी आणलेली खासगी यंत्रणाच भ्रष्टाचाराच्या गाळात अडकलेली होती. त्यावेळी झालेल्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या नोकर भरतीत गडबड-घोटाळा झाला होता. खासगी कंपनीमार्फत ही नोकरी भरती प्रक्रिया राबवली गेल्याने परीक्षा केंद्रापासून, पास करण्यापर्यंत घोटाळा झाला आहे, असा दावा पटोले यांनी केला.

TET च्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून भरती व्हावी व दर्जेदार शिक्षण राहावे हा त्यामागच्या हेतू असेल; पण ज्या पद्धतीने ही प्रकिया खासगी यंत्रणेच्या माध्यमातून राबवली. त्यात गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचे दिसत आहे. राज्यात २०१४ ते १९ या काळात झालेली नोकरी भरती ही मध्य प्रदेशातील भाजपच्या शिवराजसिंह चौहान सरकारच्या काळातील ‘व्यापमं’ घोटाळ्यासारखीच आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा करावी व गुणवंत विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करून न्याय द्यावा, अशी मागणी पटोले यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com