Police Recruitment : पोलीस भरती प्रक्रियेत डमी उमेदवार; पोलिसांनी केला मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

स्पाय ब्ल्यू टूथ गॅझेटचा वापर करून पोलीस भरती प्रक्रियेत गैरप्रकार सुरु होता, पण...
Police recruitment
Police recruitmentsaam Tv

पुणे : राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेत बोगस उमेदवार बसवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्पाय ब्ल्यू टूथ गॅझेटचा वापर करून पोलीस भरती प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्या सहा टोळ्यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpari Chinchwad Police) बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशनमधील निगडी पोलीस स्टेशन मध्ये जवळपास १२६० आरोपीं विरोधात गुन्हा दाखल (Police case) करण्यात आला आहे. तर ५६ आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. (Dummy candidate in police recruitment)

Police recruitment
Swine Flu : बुलडाण्यात खळबळ! ५० डुकरांचा मृत्यू, 'स्वाईन फ्लू'चा तिसरा रुग्णही आढळला

मिळालेल्या माहितीनुसार, एका पदासाठी दहा ते बारा लाख रुपये घेऊन पोलीस भरती प्रक्रियेत गैरव्यवहार करणाऱ्या टोळीची पाळेमुळे अहमदनगर,औरंगाबाद,जालना,बीड आणि नागपूर जिल्ह्यात रुजली आहेत.पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या ७२० पदांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात बोगस उमेदवार बसवले होते. पंरतु, बोगस उमेदवार बसवण्याच्या टोळीचा डाव पिंपरी चिंचवड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून हाणून पाडला आहे.

Police recruitment
CM Eknath Shinde : अरे माझ्याकडे टॅलेंट आहे, पण..., विधानसभेत एकनाथ शिंदेंची टोलेबाजी

पोलीस भरती प्रक्रियेत गैरकारभार करणाऱ्या टोळीकडून पोलिसांना ७६ मोबाईल, ६६ इलेक्ट्रॉनिक स्पाय डिवाइस, २२ वॉकी टॉकी आणि ११ चार्जर,मोबाइल स्पाय डिवाईस लपवण्यासाठी वापरण्यात आलेले कपडे, ब्लूटूथ आणि अकरा लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्या टोळ्यांनी फक्त पिंपरी चिंचवडच नव्हे तर इतर जिल्ह्यातील पोलीस भरती प्रक्रियेत देखील मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी दिली आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com