Election : २ आमदारासह २७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी, बिहारमध्ये वातावरण तापलं

Tejashwi Yadav latest News : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनी मोठी कारवाई करत दोन आमदारांसह तब्बल २७ आरजेडी पदाधिकाऱ्यांना पक्षातून हकालपट्टी केली. बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली.
Tejashwi Yadav
Tejashwi Yadav
Published On

Tejashwi Yadav expels 27 RJD leaders ahead of Bihar elections : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षविरोधात काम केल्यामुळे तेजस्वी यादव यांनी २७ पदाधिकारी, कार्यकर्ते अ् नेत्यांवर मोठी कारवाई केली आहे. राजदने सोमवारी २७ कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकले. त्यामध्ये दोन विद्यमान आमदार, अनेक माजी आमदार आणि राज्य महिला सेलच्या प्रमुख रितू जयस्वाल यांचा समावेश आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू झाला आहे. एनडीए अन् इंडिया आघाडीमध्ये थेट टक्कर आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करत इंडिया आघाडीने प्रचाराला सुरूवात केली.

२७ नेत्यांना पक्षविरोधी कारवायाई केल्यामुळे सहा वर्षापर्यंत निलंबित केलेय. राजदकडून याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केलेय. राजदचे बिहार अध्यक्ष मंगणी लाल मंडल यांनी सोमवारी संध्याकाळी याबाबतचे अधिकृत पत्राक जारी केलेय. काढून टाकण्यात आलेल्या नेत्यांमध्ये छोटे लाल राय आणि मोहम्मद कामरान हे २ विद्यमान आमदार आहेत. राय यांना परसा मतदारसंघातून जेडीयूचे उमेदवार म्हणून निवडण्यात आले होते. तर गोविंदपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे कामरान यांना यावेळी वगळण्यात आले.

Tejashwi Yadav
Earthquake : इमारती कोसळल्या, लाईट गेली; जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ; भूकंपामुळे ६.१ रिश्टर स्केलचे हादरे

हकालपट्टी करण्यात आलेल्या माजी आमदारांमध्ये राम प्रकाश महतो, अनिल सहानी, सरोज यादव, गणेश भारती आणि अनिल यादव यांचा समावेश आहे. परिहार मतदारसंघातून रितू जैस्वाल या आरजेडीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, विरोधी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे चेहरे असलेले राजदचे तेजस्वी यादव यांनी संध्याकाळी फेसबुक लाईव्हवर छठपूजेसाठी घरी आलेल्या स्थलांतरितांना मतदानाचा अधिकार बजावल्यानंतरच राज्यातून परतण्याचे आवाहन केले.

Tejashwi Yadav
Phaltan Doctor Case: पुरावे नष्ट करून सरेंडर, SIT मार्फत चौकशी करा, फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात गावकरी रस्त्यावर

माजी उपमुख्यमंत्र्यांनी उत्सवासाठी त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी ट्रेनमध्ये प्रवास करताना होणाऱ्या अडचणीवरून रेल्वेमंत्र्यांवर निशाणा साधला. "त्या १२००० गाड्या कुठे आहेत? बिहारमधील लोक गर्दीने भरलेल्या गाड्यांमध्ये प्रवास करतात, हे व्हिडिओमध्ये दिसतेय. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारने बिहारमधील लोकांच्या या अपमानाबद्दल माफी मागावी, असेही ते म्हणाले.

Tejashwi Yadav
Cyclone Alert: महाराष्ट्रावर 'मोंथा' चक्रीवादळाचं संकट, पुण्यासह राज्यात धो धो कोसळणार,IMD चा मुसळधार पावसाचा अंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com