Dog Vaccine: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, लसीकरणासाठी थेट लंडनमधून खास पथक

Dog Bite: शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढत असून, त्यांना रेबीजची लागण होण्याची शक्‍यता आहे. याचा मानवी आरोग्यालाही धोका संभवतो.
Dog Vaccine: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, लसीकरणासाठी थेट लंडनमधून खास पथक
Published On

गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांत कल्याण गोल्डन पार्क परिसरातील तानाजी नगर येथे ही घटना घडली असून त्यामध्ये शुभम चौधरी या 27 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच एका बाईला सुद्धा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समोर आले होते. शहरात  दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कल्याण पूर्वमध्ये रेबीजमुळे पहिलाच मानवी मृत्यू गेल्या २० वर्षात झाल्यामुळे, डोंबिवली येथील पॉज संस्था आणि लंडनमधील वर्ल्ड वाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस कडून भटक्या श्वानाना मोफत अँटीरेबीज लसीकरण केले गेले. सुमारे १४० भटक्या जनावरांना ही अँटी रेबीजची लस देण्यात आली. डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, उल्हासनगर, आणि अंबरनाथ मध्ये ही मोहिम शुक्रवारी २० डिसेंबरला राबवण्यात आली असे पॉज संस्थेचे संस्थापक डॉ निलेश भणगे ह्यांनी सांगितले आहे.

Dog Vaccine: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, लसीकरणासाठी थेट लंडनमधून खास पथक
Pune Crime : धक्कादायक! शरीरयष्टी वाढवण्यासाठी इंजेक्शनचा डोस, पुणे पोलिसांनी केली मोठी कारवाई

शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढत असून, त्यांना रेबीजची लागण होण्याची शक्‍यता आहे. याचा मानवी आरोग्यालाही धोका संभवतो. "पॉज'तर्फे दर वर्षी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेबीज लसीकरण मोहीम घेतली जाते. ठाणे शहरासह उपनगरात भटक्‍या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. रेबीज झालेला कुत्रा माणसाला चावल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे शहरी कुत्र्यांना "अँटी रेबीज लस' देण्याचा उपक्रम "पॉज'ने मागील एकवीस वर्षांपासून सुरू केला.

Dog Vaccine: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, लसीकरणासाठी थेट लंडनमधून खास पथक
Bhopal Crime: ५२ किलो सोनं, १० कोटींची रोकड, जंगलात उभ्या असलेल्या कारमध्ये घबाड सापडलं

विविध पालिकांकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. त्याचवेळी त्यांचे लसीकरण करण्यात येते. मात्र भटक्‍या कुत्र्यांचे लसीकरणच होत नसल्याने त्यांच्यासह परिसरातील सर्वसामान्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळेच ही विशेष रेबीजविरोधी मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. डिसेंबरमध्ये रेबीज मुळे १ मानवी मृत्यू झाल्याची घटना झाली त्यामुळे जागतिक संघटनाने ह्याची दखल घेऊन मोठ्या प्रमाणात रेबीज प्रतिबंधक लस ही भटक्या श्वानाना देण्यात येईल असे कळवले.

Dog Vaccine: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, लसीकरणासाठी थेट लंडनमधून खास पथक
Fire News : मध्यरात्री घराला भीषण आग, एकाच कुटुंबातील ४ जणांचा होरपळून मृत्यू

रस्त्यावरील भटक्‍या कुत्र्यांसह इतर प्राण्यांना रेबीजसारख्या आजारांची लागण होते. यासाठी प्लॅन्ट ऍन्ड ऍनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज)ने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. पॉज संस्थेचे ओंकार साळुंखे आणि लंडनच्या वर्ल्ड वाईड व्हेटरनरी सर्व्हिसचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन आणि राज गुप्ता यांच्या साथीने विशेष लसीकरण मोहीम राबवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com