Tadoba Core Zone Closed : जंगल सफारीचा प्लॅन करताय? त्याआधी 'ताडोबा'ची ही बातमी वाचा

Tadoba Safari : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोअर झोनमध्ये १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान पावसाळ्यातील आणि प्रजनन काळातील संरक्षणासाठी सफारी बंद राहणार असून, बफर झोनमधील सफारी सुरू राहणार आहे.
tadoba safari
tadoba core zonesaam tv
Published On

नागपूर शहरापासून सुमारे १५० किमी दूर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक जंगल सफारीसाठी येतात. मात्र पुढील ३ महिन्यांसाठी ही जंगल सफारी बंद ठेवण्यात येणार आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबरदरम्यान ही बंदी असणार आहे. हा नियम फक्त कोरझोनसाठी असून बफर झोन सुरु राहणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात वन्यप्राण्यांच्या प्रजननाचा काळ असतो आणि याकाळात वन्य प्राण्यांना पर्यटकांकडून कुठलाही त्रास पोहचू नये याची खबरदारी म्हणून या जंगल सफरी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूर शहरातील ताडोबा जंगल सफारी वाघ व अन्य वन्यप्राण्यांच्या पर्यटनासाठी प्रसिध्द असलेला हा प्रकल्प दरवर्षी पावसाळ्यात तीन महिन्यांकरिता बंद केला जातो. ११६.५५ चौरस किलोमीटर इतकं मोठं असलेल्या या जंगलात हजारो लोक पर्यटनासाठी येतात. पावसाळ्यात या जंगलातील रस्ते वाहनांसाठी गैरसोयीचे होतात. त्यामुळे हा निर्णय दरवर्षी व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या वतीने घेतला जातो. ही बंदी केवळ कोअरझोनमधील पर्यटनासाठी असून बफर क्षेत्रातील पर्यटन मात्र सुरूच राहणार आहे. १ जुलै ते ३०सप्टेंबरदरम्यान ही बंदी असणार आहे. वन्यजीवांच्या प्रजनन काळात कुठलाही व्यत्यय येऊ नये, हाही यामागील एक हेतू असल्याची माहिती मिळाली आहे.

tadoba safari
Tadoba News: नाताळ अन् नववर्षानिमित्त ताडोबाची सफारी हाऊसफुल्ल, पट्टेदार वाघ बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी

ताडोबा जंगल सफारी पार्टनसोबतच पुढील तीन महिन्यांसाठी भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, उमरेड - पवनी - करांडला व्याघ्र प्रकल्प, कोका व्याघ्र प्रकल्प या तीन व्याघ्र प्रकल्पासह विविध भागातील व्याघ्र प्रकल्पही आता बंद करण्यात आली आहे.

tadoba safari
Tadoba National Park: घनदाट जंगलातून करा ताडोबा अभयारण्याची सफर, येथे जगभरातून येतात पर्यटक

वाघांचा प्रजनन काळ कोणता ?

प्रत्येक प्राण्याच्या प्रजननाचा काळ हा निसर्ग चक्रावर अवलंबून असतो. अन्नाची उपलब्धता आणि सुरक्षित वातावरण प्राण्यांच्या प्रजननसाठी महत्त्वाचे असते. वाघांचे प्रजनन नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान होते. या काळात थंड वातावरण आणि पोषक आहार देखील प्राण्यांना मिळतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com