स्वप्नील शिंदेच्या मृत्यूचं गूढ वाढलं; 2 बरगड्या तुटल्याचं शवविच्छेदनावेळी आलं समोर
स्वप्नील शिंदेच्या मृत्यूचं गूढ वाढलं; 2 बरगड्या तुटल्याचं शवविच्छेदनावेळी आलं समोर अभिजित सोनावणे

स्वप्नील शिंदेच्या मृत्यूचं गूढ वाढलं; 2 बरगड्या तुटल्याचं शवविच्छेदनावेळी आलं समोर

4 दिवसांपूर्वी डॉ. स्वप्नील शिंदेच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली होती.
Published on

नाशिक - मेडिकल कॉलेजमधील Medical College शिकाऊ डॉक्टर Doctor स्वप्नील शिंदेच्या Swapnil Shinde संशयास्पद मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे. स्वप्नीलच्या 2 बरगड्या तुटल्याचे शवविच्छेदना दरम्यान आढळून आले आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या आतापर्यंतच्या आरोपांना बळ मिळाला आहे. 4 दिवसांपूर्वी डॉ. स्वप्नील शिंदेच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली होती.

हे देखील पहा -

कॉलेजमधील ऑपरेशन थिएटरच्या वॉशरूम मध्ये स्वप्नील संशयास्पदरित्या बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. स्वप्नीलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी कॉलेजमधील 2 सिनियर डॉक्टर विद्यार्थीनींकडून होणाऱ्या रॅगिंगमुळे स्वप्निलने आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. स्वप्नीलचा मृत्यू हा घातपात असल्याचा दावा देखील त्याच्या कुटूंबियांकडून केला गेला होता.

स्वप्नील शिंदेच्या मृत्यूचं गूढ वाढलं; 2 बरगड्या तुटल्याचं शवविच्छेदनावेळी आलं समोर
परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, आणखी एक गुन्हा दाखल

स्वप्नीलच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या डॉक्टर विद्यार्थीनी आणि कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. तर दुसरीकडे कॉलेज प्रशासनाकडून मात्र सर्व आरोप फेटाळण्यात आले होते. आता या प्रकरणी स्वप्नीलच्या 2 बरगड्या तुटल्या असल्याचे शवविच्छेदना दरम्यान आढळून आल्याने त्याच्या मृत्यू प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले असून रिपोर्टनंतर स्वप्नीलच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com