Swabhimani Shetkari Sanghatana
Swabhimani Shetkari Sanghatanagoogle

Swabhimani Shetkari Sanghatana: पुढील 15 दिवसात स्वाभिमानी शेतकरी संघटना छेडणार ऊस दरासाठी आंदोलन

Swabhimani Shetkari Sanghatana: पुढील 15 दिवसात स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दरासाठी आंदोलन छेडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Published on

पुढील 15 दिवसात स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दरासाठी आंदोलन छेडणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २५ ॲाक्टोंबर रोजी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेमध्ये गळीत हंगाम सन २३-२४ गळीत हंगामातील २०० रूपये अंतिम हप्ता आणि गळीत हंगाम २०२४-२५ च्या ३७०० रूपयाच्या प्रतिटन पहिल्या उचलीची मागणी केली होती.

राज्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत असून वरील मागणीबाबत साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची येत्या १५ दिवसात तातडीने बैठक घेऊन मार्ग काढण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कुणाल खेमनार यांच्याकडे केली.

Swabhimani Shetkari Sanghatana
Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय, तर महाविकास आघाडीला मोठा फटका

बैठकीत योग्य तोडगा न निघाल्यास पुढील पंधरा दिवसानंतर होणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र आंदोलन राजू शेट्टी यांनी इशारा दिला आहे. गत हंगामातील उसाच्या दुसऱ्या हप्त्याचे प्रतिटन दोनशे रूपये देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पैसे दिले नाहीत तर कारखान्यांचे धुराडी पेटवू देणार नाही, असाही इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

Swabhimani Shetkari Sanghatana
MPSC Exam 2024 : एमपीएससीतर्फे १ डिसेंबरला होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी नवे प्रवेश प्रमाणपत्र अनिवार्य, प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध

राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आता आघाडीने सत्ताधाऱ्यांसह प्रमुख विरोधक असणाऱ्या मविआला घेरले आहे. ऊस परिषदेतून शेट्टी सत्ताधारी महायुतीला घेरणार की मविआवर हल्लाबोल करणार? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणती भूमिका घेणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Swabhimani Shetkari Sanghatana
Devendra Fadnavis: मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित? १३७ आमदारांचा पाठिंबा, दिल्लीत महत्त्वाची बैठक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com