Raju Shetty: उसाच्या दराचा तिढा सुटला! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश, राजू शेट्टींनी काय केल्या होत्या मागण्या?

Raju Shetty: सरकारने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रस्ताव मान्य केल्याने राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. साखर कारखान्यांनी ३ हजारांच्या आतमध्ये दर दिला, त्यांनी १०० रुपये शेतकऱ्यांना द्यावेत. तसेच ज्या साखर कारखान्यांनी ३००० पेक्षा जास्त दर दिला असेल त्यांनी शेतकऱ्यांना ५० रुपये द्यावेत,अशी मागणी राजू शेट्टी यांच्याकडून करण्यात आली होती.
 Raju Shetty
Raju ShettySaam Tv
Published On

(रणजीत माजगावकर)

Swabhimani shetkari sanghatana Agitation :

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ८ तासांपासून सुरू असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन अखेर थांबवण्यात आलं. कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. सरकारने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रस्ताव मान्य केल्याने राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. (Latest News)

मागण्या मान्य झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी माध्यमांशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. आंदोलनाला मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र आल्याने त्यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले. तर आंदोलनाला यश आल्याने त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. शेतकऱ्यांच्या एकजूटीने कारखानदारांची एकजूट फोडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलनाला यश आल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा आता सांगलीकडे वळवला आहे. शनिवारी राजाराम बापू कारखान्यावर एकत्र जमायचे असल्याचं राजू शेट्टी म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदारांचे परवानगी पत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना देण्याचे आदेश दिलेत. सर्व कारखान्यांचे पत्र आल्यानंतर तसा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल ३१०० रुपये द्यावी. तर जोपर्यंत सर्व कारखान्याचे मागील तुटलेल्या उसाला १०० रुपये देण्याचे पत्र येत नाही.

तोपर्यंत तोड नाही, अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली होती. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याचं पत्र राजू शेट्टी यांना दिलं. त्यानंतर राजू शेट्टी यांनी चक्का जाम आंदोलन मागे घेतलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या मागण्यासाठी तब्बल ८ ते ९ तास पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखला होता.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील हंगाम सन २०२२-२३ मधील शेतकऱ्यांना मिळालेल्या उसाच्या दराविषयी जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांची आंदोलने केली. त्याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने, आंदोलक संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार, मागील हंगामामध्ये शेतकऱ्यांना उसाचा दर प्रतिटन रुपये ३००० पेक्षा कमी दर ज्या साखर कारखान्यांनी दिलेला आहे.

त्यांनी मागील हंगामातील शेतकऱ्यांना रुपये १०० रुपये अतिरिक्त प्रतिटन द्यावे. तर ज्या कारखान्यांनी रुपये ३००० पेक्षा जास्त दर प्रतिटन दिलेला आहे. त्या साखर कारखान्यांनी रुपये ५० रुपये प्रतिटन अतिरिक्त शेतकऱ्यांना द्यावेत. या बाबीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित साखर कारखान्यांनी पाठवावा. पुढील दोन महिन्यांमध्ये त्याला मान्यता देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना दिले आहे. याविषयीच्या सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व कारखान्यांना दिल्याचं पत्र मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.

 Raju Shetty
Raju Shetti Political Decision : महायुती, महाविकासच्या चाचपणीपासून राजू शेट्टी दाेन हात लांब, राजकीय पटलावर एकला चलाे रे...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com