Swabhimani Shetkari Sanghatana : अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस, उपाेषणकर्ते प्रशांत डिक्कर मंडपातून गायब, प्रशासनास फुटला घाम

Prashant Dikkar News : जळगाव जामोद एसडीओ कार्यालयासमोर सुरू असलेल्या या अन्नत्याग आंदोलनाला शेतक-यांचा जाेरदार पाठिंबा मिळत आहे.
swabhimani shetkari sanghatana, prashant dikkar news
swabhimani shetkari sanghatana, prashant dikkar newssaam tv
Published On

Buldhana News : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'स्वाभिमानी' चे बुलढाणा जिल्ह्यात अन्नत्याग आंदाेलन सुरु आहे. आज या आंदाेलनाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर (Prashant Dikkar Latest Marathi News) यांची बुधवारी प्रकृती खालवली हाेती. आज डिक्कर हे मंडपातून गायब झाल्याची माहिती सकाळ सकाळी समाेर आली आहे. (Maharashtra News)

swabhimani shetkari sanghatana, prashant dikkar news
Teachers Day दिवशी महाराष्ट्रातील लाखाे शिक्षक जाणार सामूहिक रजेवर; जाणून घ्या नाराजीचे कारण

गेल्या पाच दिवसांपासून जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर प्रशांत डिक्कर हे संघटनेमधील सहका-यांसमवेत अन्नत्याग आंदोलनाला बसले हाेते. या आंदाेलनाची दखल अद्याप प्रशासनाने घेतली नव्हती. त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते तीव्र संतापले हाेते. डिक्कर यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत आंदाेलन सुरुच ठेवले.

swabhimani shetkari sanghatana, prashant dikkar news
Palghar Dapchari Dairy Project : दापचरी दुग्ध प्रकल्पातील 160 कुटुंबांवर संक्रांत, सरकारने बजावली नाेटीस

दरम्यान बुधवारी रात्री अचानक डिक्कर हे उपोषण मंडपातून गायब झाल्याची माहिती आज सकाळी जळगाव जामोद परिसरात पसरली. यामुळे एकच खळबळ उडाली. उपोषणकर्ताच मंडपातून गायब झाल्याने प्रशासनाची देखील धावपळ झाली आहे.

डिक्कर हे काेठे गेले आहेत याची माहिती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे तसेच शेतक-यांकडेे देखील उपलब्ध नसल्याने प्रशासन त्यांना शाेधण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com