Urfi Javed Controversy: उर्फी जावेदच्या वादात सुषमा अंधारेंची एन्ट्री; अमृता फडणवीस, कंगणा, केतकीचा फोटो केला शेअर

चित्रा वाघ यांच वक्तव्य कितपत बरोबर आहे या विषयी त्या बोलल्या आहेत.
Urfi Javed
Urfi JavedSaam TV
Published On: 

Urfi Javed: सोशल मीडियावर सध्या उर्फी जावेद चांगलीच चर्चेत आहे. भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी दिसेल तिथे थोबडवून काढेल, असं विधान करत उर्फीवरील संताप व्यक्त केला आहे. या वादात आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. यात त्यांनी उर्फीची तुलना केतकी चितळे, अमृता फडणवीस आणि कंगना रनौत यांच्याशी केली आहे. तसेच चित्रा वाघ यांच वक्तव्य कितपत बरोबर आहे या विषयी त्या बोलल्या आहेत. (Latest Sushama Andhare News)

सुषमा अंधारे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत चित्रा वाघ यांना प्रश्न विचारले आहेत. यात त्यांनी लिहिले आहे की, "मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीतच असतो फार फार तर सलवार सूट. पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं ते तो करतो, किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच."

"अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी ? उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? ", पोस्टमध्ये पुढे लिहित त्यांनी चित्रा वाघ यांना हा प्रश्न विचारला आहे.

Urfi Javed
Sushama Andhare | 'गडकरी गोपीनाथ मुंडेंना ट्रॅपमध्ये अडकवायचे' - सुषमा अंधारे

पुढे उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नाव घेत सुषमा अंधारे यांनी लिहिले आहे की, "...पणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकटत जाल." असे सुषमा अंधारेंनी म्हटले आहे.

Urfi Javed
Urfi Javed : पुण्यात उर्फी जावेदच्या विरोधात पोलिसात तक्रार; चित्रा वाघही दणका देणार

चित्रा वाघ उर्फी जावेदच्या वक्तव्याने फार आक्रमक झाल्या आहेत. अशात उर्फीने आपले फोटो चित्रा यांना पाठवत इंस्ट्राग्राम स्टोरीतून उत्तर दिले. त्यानंतर "मला जर ती कुठे भेटली तर मी तिला थोबडवून काढेन", असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.