Supriya Sule: जानेवारीपासूनच लाडक्या बहिणींना २१०० रूपये द्या, सुप्रिया सुळेंची मागणी

Ladki Bahin Yojana: अर्जांची छाननी करून आणि निकषात बसणाऱ्या महिलांनाच ही रक्कम देण्यात येईल असं सांगण्यात आलं. त्यामुळं कुणाचा अर्ज बाद होणार? कुणाला पैसे मिळणार? असे अनेक प्रश्न महिलावर्गामध्ये उपस्थित होत आहे.
Supriya Sule News
Supriya Sule NewsSaamTV
Published On

'लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यात २१०० रूपये द्या, हा डिसेंबर महिना संपत आला आहेच. लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीपासूनच २१०० रूपये मासिक रक्कम द्यायला सुरूवात करा'. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमत्र्यांकडे केली. लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली. युतीचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना १५०० नसून २१०० मासिक रक्कम खात्यात जमा करून देऊ, असं आश्वासन युती सरकारनं दिलं होत.

मात्र, अर्जांची छाननी करून आणि निकषात बसणाऱ्या महिलांनाच ही रक्कम देण्यात येईल असं सांगण्यात आलं. त्यामुळं कुणाचा अर्ज बाद होणार? कुणाला पैसे मिळणार? असे अनेक प्रश्न महिलावर्गामध्ये उपस्थित होत आहे. अशातच या योजनेबाबात सुप्रिया सुळे यांनी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यात २१०० रूपये द्या अशी मागणी केली. त्यामुळे जानेवारी महिन्यात तरी बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Supriya Sule News
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला किती वर्ष महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिवार्य; काय आहे अट?

लाडक्या बहिणींना ३ हजार रूपये द्या

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे महायुती सरकारच्या योजनेबद्दल भाष्य केलं. 'लाडक्या बहिणींना १ जानेवारीपासून २१०० देण्यात यावेत. आता नवीन वर्ष सुरू होईल. डिसेंबर महिना काही दिवसांमध्ये संपेल. शक्य असेल तर, डिसेंबर किंवा १ जानेवारीपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यात २१०० मासिक रक्कम जमा करा. आम्ही तर म्हणतो ३ हजार रूपये द्या. कारण आम्ही सत्तेवर आलो असतो, तर महिन्याला ३ हजार रूपये देणार होतो.' असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

तर लाडकी बहीण योजनेबद्दल पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'ही योजना सुरूच राहणार आहे. या योजनेचा विस्तार होईल. अर्थ संकल्पाच्या नियोजनादरम्यान तपशीलांवर चर्चा केली जाईल. राज्याच्या आर्थिक स्त्रोतांचे मूल्यांकन केल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. पात्र महिलांना २१०० रूपये देऊ.' असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच योजनेतील लाभार्थ्यांना त्यांची देणी मिळावीत यासाठी आवश्यक प्रयत्न केले जाईल. असं आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

Supriya Sule News
Ladki Bahin Yojana: 'या' महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे, नेमकं कारण काय?

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या महिलांशी संवाद साधला. यावेळी नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या एका महिलेनं एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. 'शिंदे दादा आमचा डिसेंबरचा हफ्ता कधी येणार आहे. १५०० मिळणार की २१००?' असा प्रश्न महिलेने विचारला. यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले सर्व ठरल्याप्रमाणे मिळेल. असं उत्तर त्यांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com