Supriya Sule News: म्हणून संजय शिरसाटांना पाठीशी घालताय का? सुषमा अंधारेंबद्दल केलेल्या विधानावरुन सुप्रिया सुळे आक्रमक; CM शिंदेंवर साधला निशाणा

Sanjay Shirsat Vs Sushma Andhare: आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते, ज्यावरुन सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे..
Supriya sule vs Eknath Shinde
Supriya sule vs Eknath Shinde Saam TV

Supriya Sule On Sanjay ShirSat: शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. ज्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. याच प्रकरणावरुन राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे..

Supriya sule vs Eknath Shinde
Pune Sextortion News: धक्कादायक! पुण्यात 64 वर्षांचे आजोबा सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; ४ लाखाला घातला गंडा, video कॉल केला अन्...

याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या संबंधी ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी संबंधित लोकप्रतिनिधी हे सरकार पक्षाचे आहेत म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का? असा सवाल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विचारला आहे.

सुप्रिया सुळे यांचे ट्विट...

अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा असणारे महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली,त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे. राजकारणात कितीही तीव्र विरोध असला तरीही महिलांबद्दल बोलताना कायमच इथल्या राजकीय धुरीणांनी सुसंस्कृतपणाचा आब राखलेला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी आहेत. राजकारण असो किंवा समाजकारण, शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या संदर्भाने जर अशी आक्षेपार्ह आणि अवहेलनात्मक वक्तव्य येत असतील तर अगदी तळागाळापर्यंत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय हा प्रश्न अधिक दाहक बनतो.

Supriya sule vs Eknath Shinde
Nashik News: सातपूर गोळीबार प्रकरण; मुख्य सूत्रधारासह ६ जण पोलिसांच्या ताब्यात

तात्काळ कारवाई करण्याची मागणी..

त्यातही बेताल वक्तव्य करणारी व्यक्ती कुणी सर्वसामान्य नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा असणाऱ्या विधिमंडळातील सदस्य असेल तर राज्याचे पालक म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालणे अधिक गरजेचे आहे. संबंधित लोकप्रतिनिधी हे सरकार पक्षाचे आहेत म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का? त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही हे अतिशय खेदजनक आहे.

आक्षेपार्ह वक्तव्ये, विनयभंंग अथवा सायबर क्राईम असो महिलांच्या संबंधातील तक्रारींवर तातडीने कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील असल्याचा संदेश जाईल. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपण याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी.

शिरसाटांनी दिले प्रत्तुत्तर...

दरम्यान, या प्रकरणात संजय शिरसाट यांनीही सुप्रिया सुळेंनाा प्रत्यूत्तर दिले आहे. "मी सुप्रिया ताईंचा आदर करतो, त्या एक जाणत्या महिला नेता आहेत, मला सुप्रिया ताईंकडून ही अपेक्षा नाही, त्यांनी माझं भाषण ऐकून, मी चुकीचं काय बोललो हे सांगावे, मी शिक्षा भोगायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे... (Maharashtra Politics)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com