
राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू आहे. त्यातच मागील दोन महिन्यात शरद पवार आणि अजित पवार हे कार्यक्रमाच्या निमित्ताने आठ ते १० वेळा एकत्र आल्यामुळे या चर्चेला बळ मिळाले. त्यातच आज पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा होत आहे, त्यानिमित्ताने सुप्रिया सुळे यांनी केलेली पोस्ट आणि एका वक्तव्यामुळे दादा आणि ताई एकत्र येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी दादांची आठवण प्रत्येकवेळी येते, असं वक्तव्य केलंं, त्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. दरम्यान, शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी, "आमच्या गटातल्या काही लोकांना सत्तेत जायची इच्छा आहे" असं विधान केलं होतं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी राज्यात काहीतरी मोठं घडणार का? याबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापनदिन. मात्र यंदा हा दिवस शरद पवार गट आणि अजित पवार गट यांनी वेगळ्या कार्यक्रमांद्वारे साजरा करत आहे. शरद पवार गटाचा सोहळा सकाळी १० वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ध्वजारोहणाने सुरू झाला. तर, दुसरीकडे अजित पवार गटानेही आपला स्वतंत्र कार्यक्रम ठेवला आहे.
आज वर्धापन दिनाच्या मेळाव्याआधी सुप्रिया सुळेंच्या विधानामुळे चर्चा रंगली आहे. 'सहन करायला शिका', असं सुप्रिया सुळेंनी स्टेट्स ठेवलं होतं. यावर आज त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'माझ्या आईने दिलेला सल्ला मी माझ्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला होता, ते माझं व्यक्तिक मत आहे', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तसेच, "शरद पवारांनी मला पक्षासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत," असं त्यांनी ठामपणे सांगितलं. याशिवाय, "अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही," हेही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सुळेंच्या स्टेट्सची सध्या चर्चा सुरू आहे.
दरम्यान भावांविषयी बोलताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या. ' 'मला एकूण ६ भाऊ आहेत. सण, भाऊबीजनिमित्त मी शुभेच्छा देत असते. दादांची रोज आठवण येते', असं त्या म्हणाल्या.
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी अनेक नेत्यांनी पुण्यात पार पडत असलेल्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. यावेळी,
1. सुप्रिया सुळे -बारामती
2. अमोल कोल्हे - शिरुर
3. धैर्यशील मोहिते पाटील- माढा
4. भास्कर भगरे- दिंडोरी
5. बाळ्यामामा म्हात्रे - भिवंडी
6.बजरंग सोनावणे - बीड
7. निलेश लंके -अहमदनगर
8. अमर काळे- वर्धा
तसेच इतर आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.