Matheran Hill Station : सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय ! माथेरान मधील हात रिक्षा चालकांच्या आयुष्यात बदलाची नांदी; जाणून घ्या सविस्तर

Matheran Hill Station : माथेरानमधील हात रिक्षा ओढण्याची अमानवी प्रथा बंद होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ई-रिक्षा प्रकल्प राबवण्यात येत असून, २० चालकांना ई-रिक्षा परवाने देण्यात आले आहेत.
Matheran Hill Station
Matheran Hill StationSaam Tv
Published On
Summary
  • सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे माथेरानमध्ये हात रिक्षांची प्रथा बंद होणार.

  • ई-रिक्षा पायलट प्रोजेक्टअंतर्गत २० चालकांना परवाने मिळाले.

  • उर्वरित चालकांसाठी श्रमिक संघटनेचा न्यायालयीन लढा सुरू आहे.

  • ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा ई-रिक्षा मॉडेल माथेरानमध्ये लागू होण्याची शक्यता.

निसर्गाच्या कुशीत वसलेलं जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले माथेरान आता ऐतिहासिक बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, माथेरानमध्ये हात रिक्षा ओढण्याची अमानवीय प्रथा बंद करण्यात येणार आहे. माथेरानमध्ये ई रिक्षा पायलट प्रोजेक्ट अंतर्गत हात रिक्षा चालकांना ई-रिक्षा परवाना देण्यात येणार आहे. या प्रोजेक्टमुळे माथेरानमधील रिक्षा चालक आणि पर्यटक आनंदी झाले आहेत.

माथेरानमध्ये अजूनही अनेक हात रिक्षा चालक आजही शारीरिक मेहनतीवर पर्यटकांची वाहतूक करत आहेत. मानवाला मानवाने ओढण्याची ही प्रथा अनेक वर्षांपासून टिकून आहे. मात्र या प्रथेला आता पूर्णविराम मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने यावर कठोर भूमिका घेतली असून, सर्व चालकांचे पुनर्वसन ई-रिक्षा स्वरूपात करता येईल का याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

Matheran Hill Station
Matheran Accident : माथेरान घाटामध्ये पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात; अवघड वळणावर कारचं नियंत्रण सुटलं अन्...

माथेरानमध्ये ई रिक्षा पायलट प्रोजेक्ट अंतर्गत २० हात रिक्षा चालकांना ई-रिक्षा परवाना देण्यात आला. पर्यटकांनी या पर्यावरणपूरक रिक्षांचे स्वागत केले. मात्र, एकूण ९४ परवाना धारकांपैकी उर्वरित ७४ चालकांनाही ई-रिक्षा चालवण्याची संधी मिळावी, यासाठी श्रमिक हात रिक्षा चालक संघटना गेल्या काही वर्षांपासून संघर्ष करत आहे. अश्वपाल संघटनेने याला विरोध केला असून हा वाद थेट सुप्रीम कोर्टात गेला.

Matheran Hill Station
Matheran : दोन दिवसांत माथेरानमध्ये तब्बल ५० हजार पर्यटकांची प्रचंड गर्दी | VIDEO

अँड. कोलिन गोंसाल्विस यांनी श्रमिक संघटनेची बाजू प्रभावीपणे मांडली. तसेच केवडिया गुजरात येथे उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभ भाई पटेल ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळाली. तेथील महिलांना ई-रिक्षा खरेदी करून भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यात आल्या. हा यशस्वी मॉडेल माथेरानमध्ये लागू करता येईल का याची पडताळणी करण्याचे आदेश कोर्टाने दिले असून सरन्यायाधीश गवई यांनी ई-रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदतीची शिफारस देखील राज्य सरकारला केली आहे.

Q

सुप्रीम कोर्टाने कोणता महत्त्वाचा निर्णय दिला आहे?

A

सुप्रीम कोर्टाने माथेरानमधील हात रिक्षा बंद करण्याचे संकेत देत, ई-रिक्षा प्रकल्प राबवण्याचे आदेश दिले आहेत.

Q

सध्या किती हात रिक्षा चालकांना ई-रिक्षा परवाना देण्यात आला आहे?

A

सध्या २० हात रिक्षा चालकांना ई-रिक्षा परवाने देण्यात आले आहेत.

Q

उर्वरित चालकांसाठी काय प्रयत्न सुरू आहेत?

A

श्रमिक संघटना उर्वरित ७४ चालकांनाही ई-रिक्षा परवाना मिळावा यासाठी संघर्ष करत आहे.

Q

कोर्टाने कोणते यशस्वी मॉडेल पाहण्यास सांगितले आहे?

A

कोर्टाने गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ प्रकल्पातील ई-रिक्षा मॉडेलची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com