अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रिपदावर वर्णी लागली आणि त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आणि त्यांच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली. त्यानंतर बारामतीत पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पवार कुटुंब जसं एकत्र आलं तसे सर्व राजकीय पक्षही अखेरच्या क्षणी एकत्र आले. मात्र अनेक अपक्ष उमेदवारांनी बारामतीतून अर्ज दाखल केले आणि सुनेत्रा पवारांना पोट निवडणुकीला सामोरं जावं लागलं. मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं सुनेत्रा पवारांनी आपल्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला. आणि तो म्हणजे दादांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवण्याचा....
2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी केलेला 1 लाख 65 हजार 265 मताधिक्याचा विक्रम केला होता. सुनेत्रा पवारांनी हा विक्रम मोडित काढलाय. सुनेत्रा पवारांचा तब्बल 2 लाख 18034 मतांनी विजय झालाय. या ऐतिहासिक विजयानंत ही दादांना आदरांजलीच असल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. सुनेत्रा पवारांविरोधात निवडणुकीच्या मैदानात असलेल्या कोणत्याही उमेदवाराला साधे एक हजार मतंही मिळवता आली नाहीत. असं असलं तरी सुनेत्रा पवारांनी मात्र या विजयाचा जल्लोष न करण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. तर दुसरीकडे या निवडणुकीमुळे अजित दादांच्या वारसदार म्हणून खऱ्या अर्थानं बारामती विधानसभा मतदारसंघाची धुरा सुनेत्रा पवारांकडे आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.